शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर राज्यातील १५५८ उपनिरीक्षकांना बढत्या; पोलीस महासंचालकांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 21:29 IST

पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी त्याबाबतची कार्यवाही सुरु केली.

ठळक मुद्देविविध पोलीस घटकातील तब्बल १५५८ अधिकाऱ्यांना सहाय्यक निरीक्षक म्हणून शुक्रवारी बढती देण्यात आली आहे.सध्याच्या परिस्थितीत ही पदोन्नती ११ महिन्यासाठी असून त्यापूर्वी राज्य सरकार किंवा राज्य लोकसेवा आयोगाने या पदांना मंजुरी दिल्यास ती कायमस्वरुपी केली जाणार आहे

मुंबई - गेल्या पावणे दोन वर्षापासून प्रलंबित राहिलेल्या राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकांच्या (पीएसआय) पदोन्नतीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. विविध पोलीस घटकातील तब्बल १५५८ अधिकाऱ्यांना सहाय्यक निरीक्षक म्हणून शुक्रवारी बढती देण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक ४०० वर उपनिरीक्षक मुंबई पोलीस दलातील आहेत. बहुतांशजणांना आयुक्तालयातर्गंत पदोन्नतीवर नियुक्ती देण्यात आलेली आहे.दिर्घकाळापासून पीएसआयच्या रेंगाळेल्या बढतीबाबतचा प्रश्न ‘लोकमत’ने वारंवार मांडला होता. त्यानंतर पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी त्याबाबतची कार्यवाही सुरु केली. ‘लोकमत’च्या २१ आॅगस्टच्या अंकात विक्रमी संख्येत बढती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त दिले होते. त्यानुसार मुख्यालयाने पहिल्यादाच एकाचवेळी तब्बल १५५८ पीएसआयना बढतीचे आदेश जारी केले. सध्याच्या परिस्थितीत ही पदोन्नती ११ महिन्यासाठी असून त्यापूर्वी राज्य सरकार किंवा राज्य लोकसेवा आयोगाने या पदांना मंजुरी दिल्यास ती कायमस्वरुपी केली जाणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र