शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर 'त्या' पोलीस अधिकाऱ्याला केले निलंबीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 18:34 IST

या निलंबनामुळे पालघर जिल्ह्यातील पोलीस खात्यात खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीत एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केल्याने पालघर जिल्ह्यातील पोलीस खात्यात खळबळ माजली आहे.माजी पोलीस आयुक्त आणि यूपीचे खासदार सत्यपाल सिंग यांच्यासोबत विचारे यांनी फोटो काढून फेसबुक या सोशल मीडियावर टाकून व्हायरल केल्याची तक्रार

नालासोपारा - पालघर जिल्ह्यातील कल्याण शाखेत बदली करण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना दोन गुन्हे दाखल झाल्याचे कारण देत पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी गुरुवारी आदेश काढून निलंबीत केले आहे. या निलंबनामुळे पालघर जिल्ह्यातील पोलीस खात्यात खळबळ माजली आहे.वसई स्थानिक गुन्हे शाखेतील कार्यरत पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांची काही दिवसांपूर्वी पालघरच्या कल्याण शाखेत बदली करण्यात आली होती पण ते तिथे हजर न राहता सुट्टीवर गेले आहेत. माजी पोलीस आयुक्त आणि यूपीचे खासदार सत्यपाल सिंग यांच्यासोबत विचारे यांनी फोटो काढून फेसबुक या सोशल मीडियावर टाकून व्हायरल केल्यावर याचीच तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे करण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना सांगण्यात आल्यावर तुळींज पोलीस ठाण्यात विचारे यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत अधिकारी किंवा कर्मचारी यांनी एखाद्या लोकप्रतिनिधीस मदत केल्यामुळे 129 (1), (2), (3) लोकप्रतिनिधी कायदा 1991 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा 145 कलमानव्ये एन सी 15 ऑक्टोबरला दाखल करण्यात आली होती. हे दोन गुन्हे दाखल झाल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी निलंबित केल्याचे सूत्रांकडून कळते आणि एकूणच विधानसभा निवडणुकीत एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केल्याने पालघर जिल्ह्यातील पोलीस खात्यात खळबळ माजली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSatyapal Singhसत्यपाल सिंगAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019palgharपालघर