शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर राज्यातील ९७ पोलीस निरीक्षकांच्या बढत्यांना मुहूर्त मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 20:16 IST

मुंबईतील ३४ अधिकाऱ्यांचा समावेश; गृह विभागाचे आदेश जारी

ठळक मुद्देगेल्या वर्षभरापासून ‘पीआय’ची पदोन्नती रखडली होती. या कालावधीत ७ अधिकारी रिटायर झाले. गेल्या १२ जूनला राज्यातील १०४ निरीक्षकांना सेवा जेष्ठतेनुसार बढती देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

मुंबई : गेल्या काही महिन्यापासून प्रतिक्षा लागून राहिलेल्या राज्य पोलीसा दलातील निरीक्षकांच्या बढत्यांना अखेर ‘मुहूर्त’मिळाला आहे. मुंबईसह विविध घटकांत कार्यरत असलेल्या ९७ अधिकाऱ्यांच्या सहाय्यक आयुक्त, उपअधीक्षक म्हणून बढती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुंबईतील ३४ वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश आहे.गेल्या वर्षभरापासून ‘पीआय’ची पदोन्नती रखडली होती. बढतीच्या प्रतिक्षेत अनेक अधिकारी सेवा निवृत्त झाले. गेल्या १२ जूनला राज्यातील १०४ निरीक्षकांना सेवा जेष्ठतेनुसार बढती देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतरची कार्यवाही पुर्ण करण्यास गृह विभागाने तब्बल दीड महिन्याहून अधिक काळ घेतला आहे. या कालावधीत ७ अधिकारी रिटायर झाले.पदोन्नती मध्ये नवी मुंबई अशोक नाईक (ठाणे ग्रामीण),विनोद चव्हाण ( रेल्वे मुंबई) यांचा समावेश आहे.

मुंबईतील अधिकाऱ्यांची नावे अशी ( कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण) :

राजेंद्र चिखले,पांडूरंग दराडे, भारत भोईटे, रामचंद्र जाधव, सुनिल बाजारे, सुर्यकांत नौकुडकर, लक्ष्मण चव्हाण, प्रकाश शिंदे, विजय बाणे, श्रीकांत देसाई, राजीव सावंत, बाळकृष्ण माने, अविनाश कानडे, प्रमोद कदम, सुभाष जाधव (सर्व मुंबई), लक्ष्मण भोगन (अमरावती शहर), दिपक फटांगरे, अब्दुल अजिज बागवान, राजेंद्र पाटील (सर्व रेल्वे मुंबई), भागिरथ शेळके (एसआयडी), माधव जोशी (अप्पर महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा), विलास जाधव (जालना रेल्वे), पोमाजी राठोड (पुणे शहर), सुरेखा कपिले ( नागपूर), मृदला लाड- नार्वेकर (आर्थिक गुन्हे शाखा, वाशिम), जोत्स्ना रासम (पुणे शहर), रश्मी जाधव (महिला व बाल अपराध प्रतिबंधक,मुंबई), कल्पना गाडेकर (नक्षलविरोधी अभियान, नागपूर), रेहाना शेख (बुलढाणा), संजय सुर्वे ( पोलीस महासंचालक कार्यालय), सुहास सातार्डेकर ( जात पडताळणी, वशिम), वसंत पिंगळे ( जात पडताळणी, यवतमाळ), उदयकुमार राजशिर्के (जातपडताळणी, अमरावती) अनिल माने ( पांढरकवडा)मुंबईतील इतर अधिकाऱ्यांना मिळणार पोस्टींगवरिष्ठ निरीक्षकांच्या बढत्या प्रलंबित राहिल्याने मुंबईतील निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या गेल्या दोन महिन्यांपासून रेंगाळल्या आहेत. ३४ अधिकाऱ्यांना बढती मिळाल्याने आता त्यांच्या जागी ३४ निरीक्षकांना वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती दिली जाईल, त्यानंतर १२५ वर बढती मिळालेल्या निरीक्षकांना पोस्टींग दिले जाणार आहे. येत्या आठवड्याभरात मुंबई आयुक्तांकडून संबंधितांच्या नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईHome Ministryगृह मंत्रालय