शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकरला अटक, बनावट डॉक्टर पदवी प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 09:52 IST

Crime News : कौर यांनी केलेल्या आरोपानुसार, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या घरी आलेल्या निनावी लिफाफ्यात कागदपत्रे मिळून आली. त्यात पाटकर यांच्या विविध कागदपत्रांचा समावेश होता.

मुंबई : चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांना मंगळवारी वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून बनावट पदवी मिळवून त्याद्वारे रुग्णालयात नोकरी मिळवल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. समाजसेविका गुरुदीप कौर यांच्या तक्रारीवरून २६ मे रोजी पाटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कौर यांनी केलेल्या आरोपानुसार, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या घरी आलेल्या निनावी लिफाफ्यात कागदपत्रे मिळून आली. त्यात पाटकर यांच्या विविध कागदपत्रांचा समावेश होता. त्यातूनच पाटकर यांनी, कानपूर विद्यापीठाच्या नावाने क्लिनिकल सायकॉलॉजिस्टची बनावट पदवी मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कानपूर विद्यापीठातील छत्रपती शाहूजी महाराज विश्व विद्यालय येथून २००९ साली नमूद विषयात पीएच.डी. केल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतले. याच प्रमाणपत्राच्या आधारे लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केल्याचे कौर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार मंगळवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. बुधवारी पाटकर यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाळकडू’ या चित्रपटाच्या त्या निर्मात्या आहेत. 

संजय राऊतांवर केले होते आरोपडॉ. स्वप्ना पाटकर यांनी ३० एप्रिल रोजी ट्विटरद्वारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. पाटकर यांनी केलेल्या आरोपात, संजय राऊत गेल्या आठ वर्षांपासून शिवसेना पक्षातील त्यांचे स्थान आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत मला धमक्या आणि शिवीगाळ करत आहेत. इतकेच नाही तर माझे कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक यांनाही ते त्रास देत आहेत. मला विनाकारण पोलीस ठाण्यात बोलावण्यात येत आहे. यामुळे मी खूपच त्रस्त झाले आहे. याबरोबरच पाटकर यांनी दोन पानांची पत्र लिहून पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक नेतेमंडळींना टॅग केले आहे. यावेळी केलेल्या ट्वीटमध्ये पाटकर यांनी कोणी मारून टाकण्याआधी न्याय मिळावा, अशी मागणी सर्वांकडे केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई