Film director, producer's Facebook account hacked | चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्याचे फेसबुक अकाऊंट हॅक

चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्याचे फेसबुक अकाऊंट हॅक

पुणे : चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अक्षय इंडिकर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ 

अक्षय इंडिकर (वय ३०, रा़ मॉडेल कॉलनी, गणेशखिंड रोड) यांचे फेसबुक अकाऊंट असून त्याचा वापर ते व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी करतात. त्यांचे अकाऊंट हातळण्याचे अधिकारी ते स्वत: व त्यांच्या पत्नीकडे आहे़ त्यांच्या अकाऊंटवर सहा पेजची लिंक आहे़ २३ सप्टेंबर रोजी इंडिकर यांच्या पेज अ‍ॅडमिन अ‍ॅक्सेसच्या नोटीफिकेशनमध्ये आणखी दोन अकाऊंट जोडल्याची माहिती आली़ त्यांच्या खात्यात महम्मद मुदासीर, महम्मद इलियास अशी दोन अकाऊंट जोडली गेली होती़ त्यांनी फेसबुक पाहिल्यावर त्यांना अ‍ॅडमिन पदावरुन हटविले होते़ त्याचबरोबर त्यांच्या विविध ६ पेजवर वेगवेगळी लोकांची अकाऊंड जोडण्यात आल्याचे दिसून आले़ त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी त्यांच्या पेजवर अश्लील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्याचे दिसून आले़ त्यानंतर त्यांनी तातडीने सायबर पोलिसाकडे फिर्याद दिली आहे़ पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Film director, producer's Facebook account hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.