लग्नास नकार दिल्याने प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 15:36 IST2018-07-14T15:34:15+5:302018-07-14T15:36:00+5:30

लग्नाचे अमिष दाखवून शरीर संबंध ठेवणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या पीडितेने त्याच्याविरोधात सातारा ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविला.

Filing a rape case against a lover for refusing marriage | लग्नास नकार दिल्याने प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल 

लग्नास नकार दिल्याने प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल 

ठळक मुद्देआरोपी आणि पीडिता ही वर्षभरापूर्वी पाटोदा येथे एकाच गल्लीत राहत.त्यावेळी आरोपीने तिच्याशी ओळख वाढवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण  केले.

औरंगाबाद : लग्नाचे अमिष दाखवून शरीर संबंध ठेवणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या पीडितेने त्याच्याविरोधात सातारा ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविला. ही घटना ३० डिसेंबर २०१७ ते १२ जुलै २०१८ या कालावधीत पाटोदा येथे घडली.

रिझवान रईस अन्सारी (३०,रा. पंढरपुर)असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि पीडिता ही वर्षभरापूर्वी पाटोदा येथे एकाच गल्लीत राहत. त्यावेळी आरोपीने तिच्याशी ओळख वाढवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण  केले. 'साथ जियेंगे साथ मरेंगे' अशी शपथ घेणाऱ्या  प्रियकराने लग्नाचे अमिष दाखवून  ३० डिसेंबर २०१७ ते १२ जुलै या कालावधीत तिच्यासोबत वेळोवेळी  शारिरीक संबंध ठेवले. 

गेल्या काही दिवसांपासून पीडिता त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह करीत होती. मात्र तो वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत असे.   महिनाभरापूर्वी पिडीतेने पुन्हा लग्नाचा विषय काढल्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. त्यावेळी रिझवानने तिच्यासोबत लग्न करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतर पुन्हा काही दिवसाने पीडितेने पुन्हा लग्नाचा विषय काढताच त्याने पिडीतेला शिवीगाळ करून दमदाटी केली. 

तेव्हापासून रिझवान पिडीतेला भेटत नाही आणि तिच्याशी मोबाईलवरही बोलत नाही. यामुळे प्रेमाच्या नावाखाली लग्नाचे अमिष दाखवून रिझवाने आपली फसवणुक केल्याचे पीडितेच्या लक्षात आले. यानंतर पिडीतेने गुरुवारी (दि.१२) सातारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पोलीस उपनिरीक्षक ओगले तपास करीत आहे. 

Web Title: Filing a rape case against a lover for refusing marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.