जव्हार नगर परिषदेच्या तांत्रिक मान्यतेप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 15:38 IST2021-08-31T15:38:29+5:302021-08-31T15:38:43+5:30
नगर अभियंता प्रवीण जोंधळे यांनी जव्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जव्हार नगर परिषदेच्या तांत्रिक मान्यतेप्रकरणी गुन्हा दाखल
हुसेन मेमन, जव्हार
जव्हार नगर परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या विकासा करिता काढण्यात आलेल्या निविदेच्या तांत्रिक मान्यतेच्या कागदपत्रात बनावट सही शिक्याच्या वापर केल्याप्रकरणी जव्हारच्या संशयित आरोपी अजय सोनवणे यांचेवर जव्हार पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जव्हार नगर परिषद अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र नगरोतहान योजने अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या विकास करण्या करिता मे. युनिटेक इंजिनिअरिंग अँड कन्सल्टंट यांचे कडून 1 कोटी 59 लाख 4825 इतक्या रकमेचा अंदाजपत्रक तयार करण्यात आला होता. सदर अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांना पाठविण्यात आले होते. याबाबत तांत्रिक मान्यता व अंदाजपत्रक प्रक्रिया यांच्याशी काहीही संबंध नसतांना बनावट सही शिक्यानिशी बनावट तांत्रिक मान्यतेचे अंदाजपत्रक अजय शंकर सोनवणे यांनी नगर परिषदेचे लिपिक अनिल नागपुरे यांच्या कडे दिला होता.
याबाबत नगर अभियंता प्रवीण जोंधळे यांनी जव्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.