शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल, विधवेशी लग्न करून केली दगाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 08:15 IST

पीडित महिला मूळ अमरावतीची असून २०१० मध्ये पतीच्या मृत्यूनंतर ती एकाकी झाली होती. २६ जानेवारी २०१९ मध्ये फेसबुकवर तिची भोळेसोबत ओळख झाली. चॅटिंगदरम्यान भोळेने तिला लग्नाचे आमिष दाखविले. 

नागपूर : विधवेशी लग्न करून तिचे शारीरिक शोषण केल्यानंतर फरार झालेल्या पोलीस निरीक्षक अरविंद भोळेविरुद्ध अखेर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या भोळेला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी निलंबित केले.पीडित महिला मूळ अमरावतीची असून २०१० मध्ये पतीच्या मृत्यूनंतर ती एकाकी झाली होती. २६ जानेवारी २०१९ मध्ये फेसबुकवर तिची भोळेसोबत ओळख झाली. चॅटिंगदरम्यान भोळेने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्या मुलाचाही स्वीकार करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे महिलासुद्धा लग्नासाठी तयार झाली. ८ नोव्हेंबर २०२० रोजी आर्वीनजीकच्या (जि. वर्धा) श्रीक्षेत्र काैंडण्यपूर येथे त्यांनी लग्न केले. त्यानंतर ते नंदनवनमध्ये भाड्याने राहू लागले. नंतर भोळेच्या संपर्कातील महिला भेटीला येऊ लागल्याने महिलेेने चाैकशी केली असता तो आधीच विवाहित असल्याचे उघड झाले. त्यामुळे तिने त्याला धारेवर धरले. भोळेचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचे उघड झाल्याने या दोघांमधील वाद टोकाला गेला. महिलेने काही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन भोळेच्या लीला त्यांना ऐकवल्या. ४ मार्चला ‘लोकमत’ने हे प्रकरण प्रकाशित केल्यानंतर भोळे गायब झाला. त्याने तिचा मोबाइल नंबरही ‘ब्लॉक’ केला.दरम्यान, वैफल्यग्रस्त झालेल्या महिलेने शुक्रवारी इकडे तिकडे फोन मेसेज करून आपली व्यथा ऐकवली. तिची मन:स्थिती लक्षात घेत काहींनी हा प्रकार पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिला. आयुक्तांनी लगेच गिट्टीखदान पोलिसांना भोळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक भोळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

आजारी रजेच्या नावाखाली फरारभोळे याने कारवाईच्या भीतीपोटी आजारी रजेचा पर्याय निवडला असला तरी प्रकरणाचा बोभाटा झाल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी सायंकाळी त्याच्या निलंबनाचा आदेश काढला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे