शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 17:01 IST

वसई विरार महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनाबाहेर ऱाडा करून प्रसंगी पालिका आयुक्तांना गलिच्छ मराठमोळ्या शिव्यांची लाखोली वाहिल्याचा निंदनिय प्रकार घडला होता.

ठळक मुद्देफक्त दोनच कार्यकर्त्याना आपल्या दालनात पाठवण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यामुळे जिल्हाद्यक्ष अविनाश जाधव हे संतापले व तिकडेच दालनाबाहेर आक्रमक झाले होते. मनसेच्या अविनाश जाधव,वितेंद्र पाटील, जयेंद्र किसन पाटील, प्रवीण राऊत आणि इतर कार्यकर्त्यांवर विरार पोलिस ठाण्यात विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला.

वसई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरांतील वाढत्या रुग्णांसाठी उपचार म्हणून वालीव कोवीड सेंटर सुरू करण्यात आले मात्र याठिकाणी रुग्णांचा जीवघेणा छळ होत असल्याच्या तक्रारींमुळे मनसेने मंगळवारी दुपारी वसई विरार महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनाबाहेर ऱाडा करून प्रसंगी पालिका आयुक्तांना गलिच्छ मराठमोळ्या शिव्यांची लाखोली वाहिल्याचा निंदनिय प्रकार घडला होता.

या प्रकरणी विरार पोलिसांनी  मंगळवारी उशिरा मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह त्यांच्या समवेत सहभागी असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या विरोधात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केले तसेच अन्य विविध कलमांसह गुन्हा दाखल केल्याची माहिती जनसंपर्क पोलीस अधिकारी यांनी दिली. मनसेचे ठाणे व वसई विरार जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मंगळवारी दुपारी आपले निवडक पदाधिकारी वितेंद्र पाटील, जयेंद्र पाटील, प्रवीण राऊत आदि मनसे कार्यकर्त्यांसह पालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी यांच्या भेटीसाठी पालिका मुख्यालयात गेले होते. मात्र, फक्त दोनच कार्यकर्त्याना आपल्या दालनात पाठवण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यामुळे जिल्हाद्यक्ष अविनाश जाधव हे संतापले व तिकडेच दालनाबाहेर आक्रमक झाले होते.

यावेळी त्यांना पालिका कर्मचारी, आयुक्तांचे पोलिस अंगरक्षक यांनी आयुक्त भेटीसाठी आता जाण्यास सांगितले असता जाधव यांनी कार्यकर्त्या ना सोबत घेऊन दालना बाहेरूनच आम्ही आत येणार नाहीत, तुम्हाला शिवसेनेचे आठ आठ लोकं चालतात मग मनसे चे चार का चालत नाही असे मोठया आवाजात सांगत त्यांनी आयुक्तांना उद्देशुन शिव्यांची लाखोली वाहिली तर तिथे वालीव कोविड सेंटरमधील हेळसांड कारभाराचे फोटो आयुक्तांच्या दरवाजावर चिकटवले.

त्यानंतर पुन्हा निषेध व्यक्त करत आयुक्तांच्या विरोधात कोवीड सेंटरमध्ये सुधारणा झालीच पाहिजे तर निम का पत्ता कडवा है! असे म्हणत गलिच्छ शिव्या ही दिल्या अशी जोरदार घोषणा बाजी करीत केंद्र सुधारण्याची मागणी केली. दरम्यान जाधव यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्यालयातील वातावरण काही काळ तंग झाले होते. यानंतर घडलेल्या प्रकारा बाबत विरार पोलीस ठाण्याचे पो. हवा.प्रवीण साहेबराव निकम यांनी फिर्याद देऊन मनसेच्या अविनाश जाधव,वितेंद्र पाटील, जयेंद्र किसन पाटील, प्रवीण राऊत आणि इतर कार्यकर्त्यांवर विरार पोलिस ठाण्यात विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

 

वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी

 

बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

 

माझी संपत्ती विकून देणं देऊन टाका; आम्हा सर्वांचे अवयव दान करा !

 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पप्पू यादव यांना अमित शाहांनी दिलं असं उत्तर

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त