शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

महिलांची बदनामी करणाऱ्या बुल्ली बाई ॲप बनविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 14:36 IST

Filed a case against the developer of ‘Bulli Bai' app : याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर विभागाने गिटहबवरील बुल्ली बाई ॲप बनविणाऱ्यासह अशाप्रकारे बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहे.

मुंबई : वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन Appवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

दिल्लीतील एका महिलेने अशाप्रकारे प्रसिद्ध केलेले फ़ोटो टवीटरवर शेअर केले. त्यानंतर, हा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली. या महिलेने दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. हाच मुद्दा शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उचलून धरत,  मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

 

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होतं सेक्स रॅकेट, आक्षेपार्ह स्थितीत आढळल्या महिला   

याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर विभागाने गिटहबवरील बुल्ली बाई ॲप बनविणाऱ्यासह अशाप्रकारे बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहे.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसWomenमहिला