शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

बोगस बांधकाम मंजुरी नकाशाप्रकरणी तब्बल १७ वर्षांनी विकासकावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 20:15 IST

Mira Bhayander News : विकासकाने मात्र अनधिकृत ७ मजली इमारत उभारून त्यातील गाळे, सदनिका विकून खूप पैसे कमावला.

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामे करण्यात आघाडीवर असलेल्या ओस्तवाल बिल्डरने भाईंदरच्या ओस्तवाल ऑर्नेट इमारतीच्या नोंदणी वेळी २००४ साली दाखल केलेला पालिकेचा बांधकाम मंजुरी नकाशा बनावट असल्याचे उघडकीस आला आहे. त्यामुळे विकासक उमरावसिंह ओस्तवाल विरुद्ध तब्बल १७ वर्षांनी या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदरच्या जेसलपार्क येथे असलेली ओस्तवाल ऑर्नेट २ ही ७ मजली अनधिकृत इमारत आहे. वास्तविक १९९६ साली पालिकेने नकाशा मंजुरी करून बांधकाम परवानगी दिली होती. परंतु विकासकाने मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत बांधकाम केल्याने पालिकेने त्या नंतर जोत्याचे दाखला पासून भोगवटा दाखला सदर इमारतीस दिला नाही. 

विकासकाने मात्र अनधिकृत ७ मजली इमारत उभारून त्यातील गाळे, सदनिका विकून खूप पैसे कमावला. अनधिकृत टॉवर असून देखील महापालिकेने तोडक कारवाई केली नाहीच उलट संरक्षण देत पुरवल्या. सदर अनधिकृत इमारतीत गाळा असलेले शिजॉय मॅथ्यू यांनी राजीव देशपांडे सह सदर अनधिकृत इमारत आणि विकासक ओस्तवाल बिल्डर विरुद्ध तक्रारी व पाठपुरावा चालवला. नोंदणी कार्यालयाने सुद्धा सदर इमारतीतील मालमत्तांची खरेदी-विक्री नोंदणी तक्रारी नंतर बंद केली. दरम्यान महापालिका मात्र अनधिकृत बांधकामे पडण्यास टाळाटाळ करत आहे. काही दिवसां पूर्वी पालिकेने तळ आणि पहिल्या मजल्याचे काही गाळ्यांचे बांधकाम पडले. परंतु इमारतच अनधिकृत असताना व गच्चीवर भले मोठे बेकायदा बांधकाम असताना त्यावर मात्र अजून कारवाई केलेली नाही. 

मॅथ्यू यांच्या तक्रारीनंतर प्रभाग अधिकारी दामोदर संख्ये यांनी २२ एप्रिल रोजी नवघर पोलिसांना चक्क टपालाने पत्र पाठवून ओस्तवाल बिल्डर ने बनावट बांधकाम मंजुरी नकाशा बनवला असल्याने पालिका व गाळेधारकांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यास विनंती केली. पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्या ऐवजी चक्क टपालाने पत्र पाठवणाऱ्या प्रभाग अधिकारी दामोदर संख्ये यांनी विकासकाम पाठीशी घालण्यासाठी तसेच अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी असे खेळ चालवल्याचे आरोप तक्रारदाराने केले. 

दुसरीकडे गृहनिर्माण संस्थांची नोंदणी करणाऱ्या उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी देखील २००४ साली गृहनिर्माण संस्था नोंदणी साठी सादर केलेल्या कागदपत्रात बांधकाम नकाशा बनावट असल्याचे १४ मे २०२१ रोजीच्या पत्रान्वये नवघर पोलिसांना कळवून ओस्तवाल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सांगितले. अखेर पोलिसांनी २१ मे रोजी उमरावसिंह ओस्तवाल विरूद्ध विविध कलमां खाली गुन्हा दाखल केला आहे. परंतु अद्याप आरोपीला अटक केलेली नाही. आरोपीने आणखी फसवणुकीचे प्रकार अनधिकृत बांधकामे करून केल्याने सखोल चौकशी करण्यासाठी त्यास तात्काळ अटक करा. संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा आरोपी करा अशी मागणी तक्रारदार मॅथ्यू यांनी केली.   

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCrime Newsगुन्हेगारी