शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

दाऊदचा गेम कराचीतल्या दर्ग्याबाहेरच केला असता पण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 8:36 AM

Dawood Ibrahim: भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या आशीर्वादाने छोटा राजनने मुलगी मारियाच्या निधनानंतर दाऊदला संपवण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देछोटा राजनने मुलगी मारियाच्या मृत्यूनंतर दाऊदला संपवण्याचा प्रयत्न केलाएजाज लकडावाला एकेकाळचा दाऊदचा जवळचा सहकारी होतादाऊदला ठार मारण्यासाठी छोटा राजनने कट रचला होता

मुंबई - कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला यांच्या चौकशीत मुंबई पोलिसांना खळबळजनक माहिती मिळाली आहे. छोटा राजनचा मुख्य विश्वासू सहकारी विकी मल्होत्राच्या साथीने आम्ही १० जण कराचीतल्या दर्ग्याबाहेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला ठार करण्यासाठी वाट बघत होतो. ही घटना १९९८ मधील आहे. काही दिवसांपूर्वीच लकडवालाला मुंबई पोलिसांनी पटणाहून लकडावालाला अटक केली. त्याच्या चौकशीत हा खुलासा झाला आहे. 

भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या आशीर्वादाने छोटा राजनने मुलगी मारियाच्या निधनानंतर दाऊदला संपवण्याचा प्रयत्न केला. विकीच्या नेतृत्वात मी टीमचा एक सदस्य होतो, ज्यात फरीद तानाशा, बाळू डोकरे, विनोद मटकर, संजय घाटे आणि बाबा रेड्डी यांचा समावेश होता, आम्ही एका दर्ग्याच्या बाहेर तळ ठोकला जेथे दाऊद आपल्या मुलीसाठी काही धार्मिक विधी करण्यासाठी येणार होता, लकडावाला” स्वत: एकेकाळचा दाऊदचा जवळचा सहकारी असल्याचं पोलिसांनी सांगितले.

कुख्यात गुंड एजाज लकडावाला

एजाज लकडावालाने पोलीस चौकशीत सांगितले की, नेपाळमधील खासदार मिर्झा दिलशाद बेग यांनी अखेरच्या क्षणी डी-कंपनीला ही माहिती दिली. त्यामुळे शेवटच्या मिनिटाला आमचा प्रयत्न अयशस्वी ठरला. नाना (छोटा राजन) इतका संतापला होता की त्याने त्याच वर्षी बेगचा खून केला होता असे लकडावाला यांनी पोलिसांना सांगितले.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या चौकशीत हा खळबळजनक खुलासा उघड झाला आहे. ५० वर्षीय लकडावाला सुमारे २० वर्ष पोलिसांना चकवा देत होता. त्या काळात लकडावालाने देशभरात खंडणीचे रॅकेट सुरू करण्यासाठी स्वत: ची टोळी तयार केली. दाऊदची साथ सोडत त्याने छोटा राजनसोबत काम सुरु केले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बनावट पासपोर्ट प्रकरणात मुलगी शिफाला अटक केल्यानंतर तो मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम

गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2002 मध्ये दाऊद आणि छोटा शकीलमध्ये झालेल्या बेबनावामध्ये लकडावालाचा जीव थोडक्यात बचावला होता. आतापर्यंत लकडावालावर ६ वेळा गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. हल्ल्यानंतर सहकारी सलीम पेनवाला याने लकडावालाशी संपर्क साधला त्याने अजमेर येथील तावीज बांधायला सांगितले. शकीलचे लोक पेनवालाचा पाठलाग करतील या भीतीने मी त्याला भेटण्यापासून सावध केले होते. त्याला भेटण्यासाठी माझ्या बायकोला पाठविले. पेनवाला भेटल्यानंतर मी तिला थेट घरी न येण्यास सांगितले. पण, ती त्याबद्दल विसरली आणि घरी परतली, त्यामुळे शकीलला माझा ठावठिकाणा लागला. तावीज मिळाल्यानंतर दोन दिवसांनी माझ्यावर हल्ला झाल्याचं लकडावालाने सांगितले. लकडावालाची चौकशी अशीच सुरु राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमMumbai policeमुंबई पोलीसunderworldगुन्हेगारी जगतMurderखून