शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

कुंपणच शेत घातंय! अपघातातील वाहन सोडण्यासाठी कॉन्स्टेबलने घेतली १५ हजाराची लाच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 16:34 IST

Bribe Case : पाळधी दूरक्षेत्राचा कर्मचारी जेरबंद : सहायक निरीक्षकाचा आहे रायटर

ठळक मुद्दे याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील २७ वर्षीय तरुणाच्या वाहनाचा अपघात झालेला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाटील याला अटक करण्यात आली आहे.

जळगाव : अपघाताच्या गुन्ह्यात मदत करुन वाहन सोडण्यासाठी १५ हजाराची लाच स्विकारताना धरणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पाळधी दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल सुमीत संजय पाटील (२७,रा.निवृत्ती नगर, जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी एक वाजता पाळधी दूरक्षेत्रातच पकडण्यात आले. दरम्यान, पाटील हा दूरक्षेत्राचे प्रमुख सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड यांचा रायटर आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  भुसावळ येथील २७ वर्षीय तरुणाच्या वाहनाचा अपघात झालेला आहे. या अपघाताच्या गुन्ह्यात वाहन ताब्यात घेण्यात आलेले असून या गुन्ह्यात कागदपत्रात मदत करणे व वाहन सोडण्यासाठी कॉन्स्टेबल सुमीत पाटील याने २९ डिसेंबर रोजी तक्रारदाराकडे १५ हजाराची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. ठाकूर व सहकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी केली. त्यात तथ्य आढळून आले.

दूरक्षेत्रातच रचला सापळालाचेच्या मागणीनंतर उपअधीक्षक गोपाळ ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, सहायक फौजदार रवींद्र माळी, अशोक अहिरे, सुनील पाटील, सुरेश पाटील,मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, नासीर देशमुख व ईश्वर धनगर यांनी सोमवारी पाळधी दूरक्षेत्रातच सापळा रचला. तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्विकारताच सुमीत पाटील याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाटील याला अटक करण्यात आली आहे. सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड यांचीही चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणArrestअटकPoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग