शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला पाहून शेरेबाजी केल्याचा जाब विचारल्याने फेरीवाल्यांनी पीएसआयला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 21:46 IST

मुंबई - पत्नीची छेड काढली म्हणून हटकल्याचा राग मनात धरून सहा जणांनी पोलिस उपनिरीक्षकाला जबर मारहाण केल्याची घटना नुकतीच ...

ठळक मुद्देपोलीस उपनिरीक्षक आणि पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाही सर्व घटना येथील सीसीटीव्हींमध्ये कैद झाली आहे फेरीवाल्यांची शेरेबाजी सुरूच होती. याबाबत उपनिरीक्षकाने यातील एका तरुणाला हटकले.

मुंबई - पत्नीची छेड काढली म्हणून हटकल्याचा राग मनात धरून सहा जणांनी पोलिस उपनिरीक्षकाला जबर मारहाण केल्याची घटना नुकतीच केईएम रुग्णालयासमोर घडली. या पोलीस उपनिरीक्षकाला टॅक्सीतून अपहरण करत असताना गस्तीवरील पोलिसाची नजर पडली आणि त्याची सुटका करण्यात आली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केल्याचे भोईवाडा पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक आणि पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून चार फरार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुभाष मोहनलाल शर्मा, रोहित मोहनलाल शर्मा, भोळा जोखालाल मौर्या आणि विजयकुमार प्रजापती अशी आज अटक केलेल्या चौघांची नावं आहेत.ही सर्व घटना येथील सीसीटीव्हींमध्ये कैद झाली आहे. 

रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकचा भाऊ आजारी असल्याने त्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भावाला बघण्यासाठी उपनिरीक्षक पत्नीसह २४ नोव्हेंबर रोजी केईएम रुग्णालयात गेले. पिण्याच्या पाण्याची बाटली घेण्यासाठी दोघेही केईएम रुग्णालयासमोरील दुकानात गेले. या ठिकाणी जात असताना येथे उभ्या असलेल्या फेरीवाल्यांनी उपनिरीक्षकाच्या पत्नीकडे पाहून अश्लील शेरेबाजी केली. पहिल्यांदा दोघांनी याकडे दुर्लक्ष केले. पण फेरीवाल्यांची शेरेबाजी सुरूच होती. याबाबत उपनिरीक्षकाने यातील एका तरुणाला हटकले. यामुळे या तरुणासोबत असलेले इतर पाचही तरुण संतापले. त्यांनी उपनिरीक्षकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नाही तर जवळच उभ्या असलेल्या टॅक्सीमध्ये या तरुणांनी उपनिरीक्षकाला कोंबले. टॅक्सीतून मारहाण करीत नेत असताना उपनिरीक्षकाने मदतीसाठी आरडाओरड केली. पादचाऱ्यांनी हे ऐकून जवळून जाणाऱ्या पोलिसाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. पोलिस मागावर असल्याचे कळताच चालकाने टॅक्सी थांबवली. उपनिरीक्षकाने संधी मिळताच या तरुणांच्या तावडीतून सुटका करून घेतली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक