The father, who was constantly arguing with the mother, was killed by the daughter with the help of a friend | आईशी सतत भांडण करणाऱ्या पित्यास मुलीने मित्राच्या सहकार्याने संपवले  

आईशी सतत भांडण करणाऱ्या पित्यास मुलीने मित्राच्या सहकार्याने संपवले  

ठळक मुद्देया प्रकरणात मुलीसह एकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

जालना : आईसमवेत सतत भांडण करणाऱ्या पित्याचा एका मुलीने आपल्या मित्रांचे सहकार्य घेऊन खून केला. ही घटना रविवारी रात्री जालना शहरातील नुरानी मशीदजवळील पुलाजवळ घडली. या प्रकरणात मुलीसह एकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

मधुकर मनोहर पवार (५०] रा. कन्हैय्यानगर जालना) असे मयताचे नाव आहे. जालना शहरातील नुरानी मशिद परिसरात रविवारी रात्री एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मयताच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचा अंदाज पोलिसांना आला.  मयताच्या नातेवाईकांनीही घटनास्थळी धाव घेतली. मधुकर पवार हे पत्नीसमवेत सतत भांडण करीत असल्याचा राग मनात धरून त्यांच्या एका मुलीने कृष्णा वानखेडे व इतर एका मित्राच्या मदतीने हा खून घडवून आणल्याची फिर्याद मयताची पत्नी वंदना पवार यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिली. 

गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोनि. शामसुंदर कौठाळे यांनी  कृष्णा गणेश वानखेडे (रा. भीमनगर) याला ताब्यात घेतले. मयताच्या मुलीच्या सांगण्यावरून एका मित्राच्या सोबतीने मधुकर पवार यांचा खून केल्याची कबुली वानखेडे याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी मुलीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: The father, who was constantly arguing with the mother, was killed by the daughter with the help of a friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.