शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! सासऱ्याने लव्ह मॅरेज करून आलेल्या सूनेला ८० हजार रूपयात विकलं, असा झाला भांडाफोड....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 17:34 IST

इथे एका सासऱ्याने त्याच्या सूनेला ८० हजार रूपयात विकले. जेव्हा याची माहिती महिलेच्या पतीला लागली तर तो हैराण झाला.

लखनौच्या बाराबंकीमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. ज्या सासऱ्यांना सूने वडिलांचा दर्जा दिला त्याच व्यक्तीने आपल्या मुलीसारख्या सूनेला पैशांसाठी विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इथे एका सासऱ्याने त्याच्या सूनेला ८० हजार रूपयात विकले. जेव्हा याची माहिती महिलेच्या पतीला लागली तर तो हैराण झाला. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

ही घटना बाराबंकीच्या मल्लापूर गावातील आहे. इथे राहणाऱ्या चंद्रराम वर्माचा मुलगा प्रिन्सचं लग्न२०१९ मध्ये आसाममध्ये राहणाऱ्या एका तरूणीसोबत झालं होतं. प्रिन्सने प्रेमविवाह केला होता. तो ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून तरूणीला भेटला होता. लग्नानंतर दोघेही आनंदाने संसार करत होते. प्रिन्स आपल्या पत्नीसोबत गाझियाबादला गेला आणि दोघे तिथेच राहत होते. इथे तो टॅक्सी चालवण्याचं काम करत होता. (हे पण  वाचा : धक्कादायक! सूड उगवण्यासाठी मोठ्या बहिणीने घडवून आणला सख्ख्या लहान बहिणींवर गॅंगरेप)

इकडे पैशांच्या हव्यासापोटी सासरे चंद्ररामने प्रिन्सच्या पत्नीला ८० हजार रूपयात विकण्याचा प्लॅन केला. त्याने प्रिन्सच्या पत्नीला ४ जूनला घरी बोलवलं आणि रामू गौतमने गुजरातहून साहिल आणि त्याच्या कुटुंबीयांना बाराबंकीला बोलवलं. ज्यानंतर पूर्ण बोलणी झाली. 

प्रिन्सला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्याला धक्का बसला आणि तो पाच जूनला घरी परत आला. घरी ना पत्नी होती ना त्याच्या वडिलांचा काही पत्ता होता. त्यानंतर त्याने वडिलांविरोधात पोलिसात लिखित तक्रार दाखल केली. (हे पण वाचा : धक्कादायक! नव्या गर्लफ्रेन्डच्या मदतीने बॉयफ्रेन्डने केली जुन्या गर्लफ्रेन्डची हत्या, कारण...)

एसपी अवधेश सिंह यांच्या आदेशावरून महिला अधिकारी शकुंतला उपाध्याय यांनी पोलिसांची एक टीम तयार केली आणि त्यांनी महिलेला म्हणजे प्रिन्सच्या पत्नीला रेल्वे स्टेशनच्या बाहेरून ताब्यात घेतलं. तसेच लग्न करण्यासाठी आलेल्या तरूणासह आठ लोकांना अटक केली. 

महिलेला तिच्या सासऱ्यांनी हे सांगून आरोपीसोबत पाठवलं होतं की, ते तिला गाझियाबादला प्रिन्सकडे सोडतील. एसपी अवधेश सिंह म्हणाले की, हे प्रकरण मानवी तस्करीचं आहे. याप्रकरणी फरार चंद्रराम आणि रामू गौतम यांचा शोध घेतला जात आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश