मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात पित्यानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या राक्षस बापाने हत्येनंतर 14 वर्षांच्या मुलीच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या नराधम बापाने (40) आधी मुलीला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने विरोध केल्याने त्याने तिची गळा दाबून हत्या केल्याचे सांगण्यात येते.
यानंतरही हा राक्षस बाप एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मुलीच्या मृतदेहावरच बलात्कार केला. यानंतर आरोपी बाप स्वत:च मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचला. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, संपूर्ण प्रकार समोर आला आहे. यानंतर आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे.
ही खळबळजनक घठना गुना जिल्ह्यातील एका गावातील आहे. कँट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर, मुलीचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. यात मुलगी शेवटी तिच्या वडिलांसोबतच दिसली असल्याचे समजले. येथूनच पोलिसांना आरोपीचा संशय आला. यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपी वडिलांची चौकशी केली असता त्याने संपूर्ण खुलासा केला.
आरोपी वडिलांनी पोलिसांना सांगितले, मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास तो आपल्या मुलीला घेऊन जंगलात गेला होता. तेथे त्याने मुलीवर शारीरिक संबंध ठेवण्यास दबाव टाकला. मात्र, तिने नकार दिला. याची माहिती सर्वांना होऊ नेये म्हणून त्याने आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केली आणि तिच्या मृतदेहावर बलात्कार केला.