शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वडील मौलवी, मुलगा पुजारी; कृष्णा बनून मंदिरात पूजा करायचा कासिम, लोकांना संशय आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:13 IST

बिहारमधील एका मौलवीचा मुलगा मोहम्मद कासिम हा कृष्ण असं नाव असल्याचं खोटं सांगून मंदिरात राहत होता तसेच पूजा करत होता.

उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील एका मौलवीचा मुलगा मोहम्मद कासिम हा कृष्ण असं नाव असल्याचं खोटं सांगून मंदिरात राहत होता तसेच पूजा करत होता. मंदिर परिसरात एक वर्षापासून ओळख लपवून राहणाऱ्या या तरुणाबाबत काही लोकांना संशय आला. त्यानंतर हा धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांनी कासिमला अटक केली आहे.

गावातील काही लोकांना कासिमच्या वागण्यावर संशय आल्याने त्याच्याकडे ओळखपत्र मागण्यात आलं. पण त्याने ते दाखवलं नाही. नंतर तो काही काळ गावातून गायब झाला. काही दिवसांनी अचानक मंदिरात परत आला आणि तिथे राहू लागला. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठच्या दौराला पोलीस स्टेशन परिसरातील दादरी गावात असलेल्या एका प्राचीन शिव मंदिरात पुजारी नव्हता. 

वर्षापूर्वी एक तरुण गावात आला आणि कृष्ण असं नाव असल्याचं सांगून मंदिरात राहण्याची परवानगी मागितली. मंदिराची देखभाल करणारं कोणीही नसल्याने गावकऱ्यांना कोणताही आक्षेप नव्हता. तरुणाने मंदिरात राहून पूजा करायला सुरुवात केली. हळूहळू स्थानिक ग्रामस्थांचा विश्वासही मिळवला. तो सकाळ-संध्याकाळ पूजा, प्रसाद वाटप, हवन यासारख्या धार्मिक कार्यात सक्रिय भूमिका बजावत असे. याशिवाय भविष्य देखील सांगू लागला. 

काही काळानंतर गावातील काही लोकांना त्याच्या भाषेत, वागण्यात काहीतरी वेगळं दिसलं. जेव्हा ओळखपत्र मागितलं तेव्हा तो पळून जाऊ लागला आणि आधार कार्ड आणण्याच्या बहाण्याने १५ दिवस गायब झाला. यामुळे गावकऱ्यांचा संशय आणखी वाढला. काही दिवसांनी तो पुन्हा मंदिरात येऊन राहू लागला. 

पोलिसांनी तरुणाची कसून चौकशी केली. सुरुवातीला काहीच सांगितलं नाही. पण नंतर त्याने आपलं नाव मोहम्मद कासिम असल्याचं सांगितलं आणि तो मूळचा बिहारचा असल्याचं मान्य केलं. इतकंच नाही तर त्याने त्याच्या वडिलांचं नाव अब्बास असल्याचं सांगून ते बिहारमध्ये मौलवी असल्याचं म्हटलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासिम अनेक महिन्यांपासून मंदिरात राहत होता आणि मंदिरातील देणगीची रक्कम त्याच्या स्वत:साठी वापरत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस