जन्मदाता झाला वैरी! मुलीची केली निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 03:52 IST2021-02-07T03:51:53+5:302021-02-07T03:52:34+5:30

अजयने खुशीला चाकूने भोसकून तिचे शिर धडावेगळे केले. खुशीचे धड आणि शिर अजयने पाताळगंगा नदीत फेकले. या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार खुशीची आई आणि बहिणीने घटनास्थळावरून हाळ गावात पळ काढला.

father brutally killed girl police begin search amp | जन्मदाता झाला वैरी! मुलीची केली निर्घृण हत्या

जन्मदाता झाला वैरी! मुलीची केली निर्घृण हत्या

वावोशी : वडिलांनी मुलीचा गळा कापून खून केल्याची घटना खालापुरात घडली आहे. वडिलांचा शोध पोलीस घेत आहेत.

अजय सिंह (५०, रा. सरिराॅय पोलीस ठाणे कुद्रा. जि. कैमुर, भबुआ. बिहार) हा त्याची पत्नी आणि दोन मुलींसह चार दिवसांपूर्वी खालापूर तालुक्यात आला होता. खोपोली शहरातील एका लाॅजवर हे कुटुंब राहिले होते. शुक्रवारी ५ वाजता अजय पत्नी आणि मुलीला खालापूर हद्दीतील हाळ गावानजीक म्हाडा काॅलनीच्या मागे घेऊन गेला. अजयने खुशीला चाकूने भोसकून तिचे शिर धडावेगळे केले. खुशीचे धड आणि शिर अजयने पाताळगंगा नदीत फेकले. या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार खुशीची आई आणि बहिणीने घटनास्थळावरून हाळ गावात पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल विभुते, महिला पोलीस उपनिरीक्षक अंबिका अंधारे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. खुशीचे धड नदीत सापडले असून शनिवारी नदीपात्रात शोध घेऊन शिर सापडले नव्हते. अजय खून करून फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

खून झालेल्या मुलीच्या मृतदेहाचे धड सापडले असून शवविच्छेदनासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे. मुलीची आई आणि बहीण यांचे जाबजबाब आणि पंचनामा सुरू आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असला, तरी त्याचे लोकेशन सापडले आहे. लवकरच आरोपी ताब्यात असेल.
- अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, खालापूर
 

Web Title: father brutally killed girl police begin search amp

टॅग्स :Murderखून