शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भयंकर! आधी आईचा 50 लाखांचा विमा काढला अन् नंतर तिचीच...; पैशांसाठी लेक झाला हैवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 10:37 IST

वडील मंदिरातून आले. त्यांनी आपल्या मुलाला पत्नीबद्दल विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांची नजर घरात पडलेल्या पत्नीच्या चप्पलवर पडली आणि त्यांना संशय आला. 

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एका मुलाने आपल्याच आईची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाला आईच्या विम्याचे 50 लाख रुपये हवे होते. हत्या केल्यानंतर मुलाने आपल्या आईचा मृतदेह पोत्यात बांधून यमुना नदीच्या काठावर असलेल्या ढिगाऱ्यामागे फेकून दिला. गावकऱ्यांना मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

मुलाच्या संशयास्पद हालचालींवरून वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मुलगा घरातून पळून गेला. या घटनेत आणखी दोन जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस तपासात व्यस्त आहेत. आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून मुलगा घरी परतला होता. तेवढ्यात त्याचे वडीलही मंदिरातून आले. त्यांनी आपल्या मुलाला पत्नीबद्दल विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांची नजर घरात पडलेल्या पत्नीच्या चप्पलवर पडली आणि त्यांना संशय आला. 

चुलत भावासह पत्नीच्या शोधासाठी ते यमुना नदीच्या काठी पोहोचले. तेथे पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गोणी उघडली असता महिलेचा मृतदेह पोत्यात भरलेला दिसला. त्यावर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमार्टमसाठी पाठवला. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

धाता पोलीस स्टेशन हद्दीतील छोटी अढौली गावातील रहिवासी रोशन सिंह सोमवारी संध्याकाळी चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंगळवारी दुपारी दर्शन घेऊन ते परत आले असता त्यांना त्यांची पत्नी प्रभा देवी घरी नसल्याचं दिसलं. मुलगा हिमांशूला त्याच्या आईबद्दल विचारले असता, त्याने उत्तर दिलं नाही. त्यामुळे त्यांना संशय आला. 

या घटनेबाबत रोशन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने माझा आणि माझ्या पत्नीचा प्रत्येकी 50 लाख रुपयांचा विमा उतरवला आहे. विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याने आईची हत्या केली. यापूर्वीही त्याने मामाच्या घरातून दागिने गायब केले होते. हिमांशू पॉलिसीमध्ये नॉमिनी होता. सध्या पोलिसांनी रोशन यांच्या तक्रारीवरून मुलगा हिमांशूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार हिमांशूचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश