शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सूनेची डोकेदुखी दूर करण्यासाठी घरी तांत्रिकांना बोलवलं, त्यानंतर जे झालं ते वाचून व्हाल हैराण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 11:18 IST

ही घटना बिंदकी गावातील आहे. महिलेसोबत झालेल्या प्रकाराची माहिती तिच्या भावाला लागली तर तो तिच्या घरी गेला आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. इथे एका महिला डोकेदुखीचा त्रास होत असल्याने एका तांत्रिकाकडे गेली. तिच्यावर उपचार करण्याच्या नावावर त्यांनी महिलेसोबत जे केलं ते वाचून नक्कीच अंगावर शहारे येतील. महिलेवर उपचार करण्याच्या नावावर तिच्या शरीरावर या तांत्रिकांनी गरम चिमट्याचे चटके दिले. त्यासोबतच रात्रभर तिला मारहाण करण्यात आली. असे सांगितले जात आहे की, महिलेच्या सासऱ्यांनी तांत्रिकांना घरी बोलवलं होतं.

ही घटना बिंदकी गावातील आहे. महिलेसोबत झालेल्या प्रकाराची माहिती तिच्या भावाला लागली तर तो तिच्या घरी गेला आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सोबतच या प्रकरणाची पोलिसात तक्रारही दिली.

मीडिया रिपोर्टनुसार रोटी गावात राहणारी महिला अनीता देवीचं वय ३० वर्षे आहे. काही दिवसांपासून तिला डोकेदुखीचा त्रास होत होता. डोकेदुखी थांबतच नव्हती. अशात तिच्या सासऱ्यांनी ठरवलं की, तिच्यावर काळ्या जादूने उपचार करू आणि मंगळवारी सायंकाळी त्यांनी दोन तांत्रिकांना घरी बोलवलं. (हे पण वाचा : इंदापूर तालुक्यात विधवा सुनेला मारहाण, सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल)

अनीता बेशुद्ध होती, तांत्रिक गेले होते...

घरातील लोकांचा आरोप आहे की, तांत्रिकांनी उपचाराचं नाटक करत अनीता देवीच्या हात-पायांना गरम चिमट्यांनी चटके दिले आणि रात्रभर तिला मारहाण केली. सकाळी होईपर्यंत अनीता बेशुद्ध पडली होती. ज्यानंतर तांत्रिक तेथून पसार झाले. कुटुंबीयांनी सांगितलं की, गरम चिमट्यांच्या जखमा तिच्या हात आणि पायांवर आहेत. (हे पण वाचा : पिंपरी चिंचवडमध्ये वाहन भाड्याने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश)

सासऱ्याला अटक

बुधवारी सकाळी या घटनेची माहिती अनीताचा भाऊ जयनारायण याला लागली. तो घाईघाईने बहिणीच्या घरी पोहोचला. जयनारायण महिलेच्या सासऱ्यावर नाराज झाला आणि अनीताला जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याने दाखल केलं. यानंतर तिच्या सासऱ्या आणि तांत्रिकांविरोधात पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या सासऱ्याला ताब्यात घेतलं आहे आणि दोन्ही तांत्रिकांची चौकशी केली जात आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी