फॅशन डिझायनरवर बलात्काराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 01:51 IST2021-01-05T01:51:36+5:302021-01-05T01:51:47+5:30

तिच्या एकटेपणाचा फायदा घेत, लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिच्यावर बलात्कार केला. मात्र, नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.

Fashion designer accused of rape | फॅशन डिझायनरवर बलात्काराचा आरोप

फॅशन डिझायनरवर बलात्काराचा आरोप


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवत २५ वर्षीय फॅशन डिझायनर तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रविवारी वाकोला पोलिसांनी फरकान खान नामक तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. जो व्यवसायाने सीए आहे.


पीडित आणि आरोपी एकमेकांना ओळखत असून, सोशल मीडियावर त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर, खानने तिच्याकडे काही पैशांची मागणी केली. तिला पैसे परत देतो, असे त्याने कबूल केले. मात्र, नंतर तो तिला टाळू लागला. ती पैसे मागायची, तेव्हा तो तिला कारणे द्यायचा. काही दिवसांनी त्याने तिला परत संपर्क करत, पैसे परत करण्यासाठी भेटण्यास सांगितले. त्यानुसार, ती एकटी राहत असलेल्या तिच्या वाकोल्यातील घरात तो तिला भेटायला गेला. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत, लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिच्यावर बलात्कार केला. मात्र, नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे तिने या प्रकरणी वाकोला पोलिसात तक्रार दिल्यानंतर खानविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाकोला पोलीस यात चौकशी करत आहेत.

n फरकान खान नामक तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: Fashion designer accused of rape