शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, IPL खेळाडूची होणार चौकशी; अखेरचा कॉल उलगडणार गुपित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 13:13 IST

तानिया गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ती फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंगचे शिक्षण घेत होती. तानियाने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. 

सूरत - इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा खेळाडू अभिषेक शर्मा वादात सापडला आहे. सुरतमधील प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंहच्या आत्महत्येनंतर स्थानिक पोलिसांकडून चौकशीसाठी अभिषेकला समन्स पाठवण्यात आले आहेत. मॉडेल तानियाने २३ वर्षांच्या अभिषेकला शेवटचा कॉल केला होता हे तपासात समोर आले. अशा परिस्थितीत पोलीस सर्व अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

२८ वर्षीय तानिया फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करायची. इंस्टाग्रामवर तिचे १०००० पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये ती डिस्क जॉकी, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल असल्याचे लिहिले आहे. तानियाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी सुरतमध्ये तपास सुरू केला. यादरम्यान आयपीएलमध्ये एसआरएच खेळाडू अभिषेक शर्माचे नाव पुढे आले. अभिषेक तानिया सिंहच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळलं. तपासात असेही समोर आले की तानिया आणि अभिषेक काही काळापासून एकमेकांच्या संपर्कात नव्हते, परंतु पोलिसांनी अभिषेकला चौकशीसाठी बोलावले कारण तो तिचा मित्र होता.

मॉडेल तानिया काल (२० फेब्रुवारी) उशिरा घरी परतली आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली. मॉडेलचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर तिच्या कुटुंबाला धक्का बसला. या प्रकरणात तानियाच्या कॉल डिटेल्समध्ये अनेक गुपिते दडलेली असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय तिचा शेवटचा फोनही अभिषेक शर्मालाच होता हेही समोर येत आहे. त्यामुळे आत्महत्येमागे प्रेमप्रकरण आहे का? या दृष्टिकोनातून पोलीस सध्या तपास करत आहेत. तानिया गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ती फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंगचे शिक्षण घेत होती. तानियाने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. 

दरम्यान, अभिषेक शर्मा सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादशी संबंधित आहे. तो अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आयपीएलमधील ४७ सामन्यांमध्ये 137.38 च्या स्ट्राइक रेटने ८९३ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ७५ आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत ४ अर्धशतके आणि ९ विकेट्स घेतल्या आहेत. अभिषेकला सनरायझर्स हैदराबादने २०२२ च्या आयपीएल लिलावात ६.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी