शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

देहविक्रय करण्याची कुटुंबाची प्रथा, ‘तिचे’ बेहाल संपेना; अडकली नैराश्येत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 08:48 IST

मध्य प्रदेश येथील मंदसौर जिल्ह्यातील उतपुरा गावातील परंपरेने चालत आलेल्या देहविक्रेय प्रथा स्वीकारण्यासाठी या तरुणीवर दबाव टाकला जात होता. परंतु, ती या कुप्रथेला विरोध करत राहिली.

- प्रज्ञा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : असामाजिक प्रथेला झुगारत असताना प्रथम नैराश्येत गेलेल्या आणि नंतर मानसिक रुग्ण झालेल्या तरुणीवर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने उपचार केले खरे. परंतु, आता प्रश्न उभा राहिलाय तो तिच्या पुनर्वसनाचा. पुन्हा त्या असामाजिक प्रथा असलेल्या कुटुंबात जाण्यास नकार देणाऱ्या या २८ वर्षीय तरुणीचे पुनर्वसन कसे आणि कुठे करायचे, असा प्रश्न मनोरुग्णालय प्रशासनासमोर आहे. कुटुंबात चालत आलेल्या देहविक्रेयच्या कुप्रथेला विरोध करून मनोरुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या या तरुणीला स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे. तिच्या पुनर्वसनासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची इच्छा मनोरुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

मध्य प्रदेश येथील मंदसौर जिल्ह्यातील उतपुरा गावातील परंपरेने चालत आलेल्या देहविक्रेय प्रथा स्वीकारण्यासाठी या तरुणीवर दबाव टाकला जात होता. परंतु, ती या कुप्रथेला विरोध करत राहिली. या दबावामुळे प्रथम ती नैराश्याने वेढली गेली आणि हळूहळू तिला मानसिक त्रास होऊ लागला. या जाचातून सुटण्यासाठी तिने राजस्थान येथील एकाशी प्रेमविवाह केला. परंतु, तोही तिला मद्यपान करून मारहाण करायचा. ज्यावेळी त्याला या तरुणीच्या कुटुंबात चालत आलेल्या असामाजिक प्रथेबद्दल कळले त्यावेळी त्याने आणखी त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून ती पुन्हा आईकडे गेली असता, त्या दोघींमध्ये वाद झाला. 

तिथूनही ती बाहेर पडली आणि पुन्हा पतीकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या दरम्यान तिचा पती सूरतला कामाला असल्याचे कळले. त्याला शोधण्यासाठी ती  सुरत ट्रेनमध्ये बसली आणि भ्रमिष्ट अवस्थेत  मुंबईत आली. मुंबईत कशी आली, हे मात्र तिला  आठवत नाही. रस्त्यावर भरकटलेल्या अवस्थेत असताना ती वाकोला पोलिसांना आढळली. त्यांनी   प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. समुपदेशनानंतर अन्यायाची माहिती दिली, असे समाजसेवा अधीक्षक रंजना  दोनोडे यांनी सांगितले.

कुटुंबाकडूनही आला नकारnसुरुवातीला ती घरचा पत्ता सांगत नव्हती. तिला तिच्या घरी आणि त्या असामाजिक प्रथेत जायचे नव्हते. नंतर तिचे समुपदेशन करून तिच्यात उत्साह निर्माण केला. nतिने पत्ता सांगितला खरा पण कुटुंबाकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. आता तिच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. एखादी चांगली सामाजिक संस्था पुढे आल्यास तिथे तिचे पुनर्वसन केले जाईल, असे मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय बोदाडे यांनी सांगितले. nबरे झाल्यावर मनोरुग्णांचे सामाजिक पुनर्वसन होत नाही हा मोठा प्रश्न आहे. डॉ. बोदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रियांका बनोकर  तिच्यावर उपचार केले आहेत.

स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्धारपती आणि आई हे दोन पर्याय तिच्यासमोर असले तरी तिने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आणि त्या जिद्दीने भरारी घेण्याचा विचार प्रशासनाकडे तिने बोलून दाखवला आहे. तिच्या या जिद्दीचे कौतुक करून प्रशासन तिचा उत्साह वाढवत आहे आणि त्यादृष्टीने पुनर्वसनाचा प्रयत्नही करत आहे.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसाय