शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक कलाहात वृद्ध पित्याच्या छातीत संतप्त मुलाने खुपसला सुरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 19:24 IST

Murder Case : झरी तालुक्यात निर्घृण खून : मारेकरी मुकुटबन पोलिसांच्या ताब्यात 

ठळक मुद्देया प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी मारेकरी मुलाला गुरुवारी सकाळी अटक केली. नथ्थु केशव आसूटकर (४८) असे मृताचे नाव आहे.या वादात संतापलेल्या वैभवने धारदार सुरा भोसकून नथ्थु आसूटकर यांना गंभीर जखमी केले.

मुकुटबन (यवतमाळ) : कौटुंबिक कलहातून संतापाच्या भरात मुलाने पित्याच्या छातीत सुरा भोसकून त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास झरी तालुक्यातील भेंडाळा येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी मारेकरी मुलाला गुरुवारी सकाळी अटक केली. नथ्थु केशव आसूटकर (४८) असे मृताचे नाव आहे.

या प्रकरणी मारेकरी मुलगा वैभव नथ्थु आसूटकर याच्याविरुद्ध पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मृत नथ्थु आसूटकर यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यापैकी एका मुलीचे लग्न झाले असून, दुसरी शिक्षणासाठी भद्रावती येथे राहत होती. नथ्थू आसूटकर हे पत्नी व मुलासह भेंडाळा येथे राहून शेती करीत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. ते नेहमी घरी दारू पिऊन वाद करीत असत. बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ते घरी आले. या वेळी मुलगा वैभव याच्यासोबत त्यांचा वाद झाला. या वादात संतापलेल्या वैभवने धारदार सुरा भोसकून नथ्थु आसूटकर यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना वणीतील खासगी रुग्णालयात आणण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, प्रकरण अंगलट येईल म्हणून नथ्थु आसूटकर यांचा मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा बहाणा करून थेट भेंडाळ्यात आणण्यात आला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची कुणकुण मुकुटबन पोलिसांना लागली. लगेच पोलिसांनी भेंडाळा येथे जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. तसेच वैभवलाही पोलीस ठाण्यात आणले. मृताचा भाऊ जगन केशव आसूटकर यांच्या तक्रारीवरून गुरुवारी सकाळी ७ वाजता वैभवला अधिकृत अटक करून त्याच्याविरुद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी भेंडाळा येथे घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार धर्माजी सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड व जितेश पानघाटे करीत आहेत.

सलग दुसरी घटना मुलाने वृद्ध पित्याचा खून केल्याची घटना बुधवारी पारवा ता. घाटंजी येथे घडली. या घटनेची वार्ता ताजी असतानाच बुधवारीच रात्री झरी तालुक्यातील भेंडाळा गावातही वृद्ध पित्याला पोटच्या मुलाने ठार केले. सलग घडलेल्या या दोन घटनांनी जिल्हा हादरला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसYavatmalयवतमाळDeathमृत्यू