शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकाचीच उलट तपासणी आली अंगाशी, तोतया पोलिसाला चांगलाच महागात पडला पंगा 'खाकीवर्दी'शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 15:45 IST

हे चौधरी साहेब,खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आहेत. यांना ओळखत नाही काय?

राजगुरुनगर: पोलीस असल्याची बतावणी करत व पोलिसांचा यूनिफॉर्म परिधान करून तोतयागिरी केल्याप्रकरणी खेडपोलिसांनी तोतया पोलिसाला जेरबंद केले आहे. जयदीप नवीनकुमार शहा(वय २०, सध्या. रा. चाकण, ता खेड , मूळ गाव, अकोले जि. अहमदनगर) असे तोतया पोलिसाचे नांव आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, खेड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी हे साध्या वेशात मित्राबरोबर गुळाणी घाट येथे फिरायला गेले होते. रस्त्यालगत झाडाखाली बसुन भेळ खात असताना जयदीप नवीनकुमार शहा हा तोतया पोलिस व त्यांचा मित्र हे दोघे जण गुळाणीवरून दुचाकीवरून येत होते. दुचाकी थांबवुन पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी व मित्रांना तोतया पोलिसाने विचारले, ‘तुम्ही इथे काय करता दारू पिता आहे काय, दारू कुठे लपवून ठेवली ते सांगा’.. तोतया पोलिसाच्या अंगावर ट्राफिक पोलिसांचा युनिफॉर्म परिधान केला असल्याने व त्यावर महाराष्ट्र पोलिस नावाचे जर्किंग व डोक्यात कॅप असल्याने चौधरी यांनी तोतया पोलिसाला विचारले की, तु कुठल्या पोलीस ठाण्यात काम करतो, त्यावर त्यांने सांगितले मी चाकण येथे काम करत आहे. दरम्यान चौधरी यांच्या मित्रांनी तोतया पोलिसाला सागितले, हे चौधरी साहेब,खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आहेत. यांना ओळखत नाही काय ? त्यावर तोतया पोलिसाने म्हटले ‘साहेब, तुम्ही पण का’ असे म्हणून एक सॅल्युट मारून तेथुन पळ काढला. चौधरी यांना तोतया पोलिस असल्याची शंका आल्याने त्यांनी खेड पोलीस ठाण्यात फोन केला. एक तोतया पोलिस खेडच्या दिशेने येत आहे. त्याला ताब्यात घेऊन नक्की पोलीस आहे काय याबाबत चौकशी करा. तात्काळ पोलिस हवालदार तान्हाजी हगवणे, संतोष मोरे, कोमल सोनुमे यांनी सापळा रचुन राक्षेवाडी येथील गणपती मंदिरासमोर दुचाकी वर येत असताना तोतया पोलिसाला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवत कसुन चौकशी केली असता पोलीस असल्याची खोटी बतावणी करून पोलिस युनिफॉर्म परिधान करून तोतयागिरी करत असल्याचे सांगितले. शहा हा चाकण ते भोसरी येथे रिक्षा चालविण्याचे काम करत तो पोलिसांचा फॅन असल्याचे सांगतो .त्याने पुणे येथून एक ट्रॉपिक पोलिस गणवेश शिवून घेतला होता. तो परिधान करत फिरत होता. गणवेशावर लावलेली नेमप्लेट सापडली असल्याचे सांगितले. यापूर्वी चाकण परिसरात येथेही दोन रिक्षाचालकांना जास्त प्रवाशी भरता म्हणून त्यांना गुन्हे दाखल करण्यांची धमकी देऊन प्रत्येकी दोनशे रुपये शहा याने घेतले होते. या सर्व प्रकाराबाबत पोलीस हवालदार कोमल तोताराम सोनुने यांनी खेड पोलीस ठाण्यात शहा यांच्या विरोधात फिर्याद दिली असून अटक केली आहे.

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसArrestअटक