शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
2
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
3
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
4
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
5
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
6
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
7
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
8
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
9
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
10
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
11
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
12
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
13
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
14
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
15
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
16
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
17
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
18
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
19
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
20
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
Daily Top 2Weekly Top 5

बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 19:10 IST

ED Fake passport: ईडीने पश्चिम बंगालमधून चालणाऱ्या मोठ्या बनावट पासपोर्ट रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.

ED Fake passport: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पश्चिम बंगालमध्ये एका मोठ्या बनावट पासपोर्ट रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटच्या माध्यमातून सुमारे ४०० बांग्लादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात पाकिस्तानी नागरिक आजाद मलिक आणि त्याचा साथीदार इंदुभूषण हलदार हे दोघे मुख्य आरोपी असल्याचं ईडीने स्पष्ट केलं आहे. दोघेही हवाला व्यवहार आणि बनावट ओळखपत्र तयार करण्याच्या रॅकेटमध्ये गुंतले होते. हे रॅकेट नदिया जिल्ह्यातील चकदाहा शहरात सुरू होते. 

इंदुभूषण हलदारला अलीकडेच अटक करण्यात आली असून, त्याने चौकशीत कबूल केलं की, तो पाकिस्तानी नागरिक आजाद मलिकचा जवळचा सहकारी होता. आजाद मलिकने बनावट भारतीय ओळखपत्राच्या नागरिकत्व मिळवलं. त्यानंतर कोलकात्यातील एका भाड्याच्या घरातून त्याने हवाला व्यवहार आणि बनावट पासपोर्ट बनवण्याचं रॅकेट चालवलं.

२ कोटींच्या वरचा हवाला व्यवहार

ईडीच्या तपासात आतापर्यंत २ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. हे सर्व व्यवहार इंदुभूषण हलदारमार्फतच पार पाडले गेले, असा आरोप आहे. इंदुभूषणने एका मध्यस्त्याच्या घरातून सायबर कॅफे आणि संगणक उपकरणं भाड्याने घेऊन, बनावट कागदपत्रांच्या आधारे ३०० हून अधिक पासपोर्ट तयार केले. ईडीने त्याला शनिवारी न्यायालयात हजर केलं असता, २७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

बनावट पासपोर्ट कसा तयार करायचे? 

तपासात समोर आलं आहे की, रॅकेटमधील लोक आधी बांग्लादेशी नागरिकांसाठी बनावट आधार आणि पॅन कार्ड तयार करायचे. तक्यानंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट केली जात. शेवटी बनावट पत्त्यांचा वापर करून पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट मिळवले जात.

पाकिस्तानी लिंकची चौकशी सुरू

पोस्ट विभागातील काही कर्मचार्‍यांचीही या रॅकेटमध्ये संगनमत असल्याचा संशय आहे. प्रत्येक बनावट पासपोर्टसाठी सुमारे पाच लाख रुपयांची मागणी केली जात होती. ईडी अधिकाऱ्यांच्या संशयानुसार, आजाद मलिकप्रमाणेच आणखी सात पाकिस्तानी नागरिकांनी बांग्लादेशमार्गे भारतात प्रवेश करून भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा संशय आहे. या सर्वांचा तपास सध्या सुरू असून, ईडीकडून अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake passport racket exposed; 400 Bangladeshi infiltrators get Indian passports.

Web Summary : A major fake passport racket was exposed in West Bengal by ED. Around 400 Bangladeshi infiltrators obtained Indian passports using forged documents. Pakistani citizen Azad Malik and his associate are the main accused. Investigation is ongoing.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तानIndiaभारतpassengerप्रवासीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय