शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

नकली नोटा प्रकरण : एमआयएमचा माजी जिल्हाध्यक्ष शहजादखानला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:19 IST

मुख्य आरोपी इरफान हनीफ पटनी मूळ रा. गुजरात ह.मु.वडनेर (भोलजी) याच्यासह खामगाव, मलकापूर, नांदुरा येथून सहा आरोपींना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

मलकापूर (बुलडाणा) : मलकापूर शहरातील एचडीएफसी बँकेत नकली नोटा जमा करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीनंतर एमआयएमचा माजी जिल्हाध्यक्ष, नगरसेवक शहजाद खान सलिम खान (३८) याला  बुधवारी पहाटे ३ वाजता  पोलिसांनी नकली नोटांसह अटक केली. दुपारनंतर त्याला न्यायालयासमोर उपस्थित केले जाणार आहे. आतापर्यंत या आरोपींची संख्या सात झाली आहे.

बँकेत पाचशे रुपये मूल्याच्या ३८ नोटा जमा केल्याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी मुख्य आरोपी इरफान हनीफ पटनी (मूळ रा.गुजरात, ह.मु.वडनेर भोलजी) तर खामगाव सजनपुरी येथील इमरान साहेर शेख मोहम्मद ऊर्फ बबलू या दोघांना अटक केली होती. त्यांना दोनवेळा पोलीस कोठडी देण्यात आली. कोठडीदरम्यान या गुन्ह्यात ताहेर अहमद जमीर अहमद (३१, रा.पेठ मोहल्ला नांदुरा), मोहम्मद वसीम मोहम्मद नदीम (२१, रा.गांधी चौक मलकापूर) या दोघांची नावे पुढे आली. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. त्या दोघांकडून पाचशे रुपयांच्या प्रत्येकी दोन-दोन नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या. त्या दाेघांना १२ मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली. त्यांच्या कोठडीदरम्यान आणखी माहिती पुढे आली.

मुख्य आरोपी इरफान हनीफ पटनी मूळ रा. गुजरात ह.मु.वडनेर (भोलजी) याच्यासह खामगाव, मलकापूर, नांदुरा येथून सहा आरोपींना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आता बुधवारी पहाटे ३ वाजता शहर पोलिसांनी एमआयएमचा माजी जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक शहजाद खान सलीम खान, रा. मालीपुरा मंगलगेट मलकापूर याला नकली नोटांसह अटक केली.दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करणार केले जाणार आहे. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात एपीआय स्मिता म्हसाये करीत आहेत.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन