शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळ! ‘एसपी चंद्रपूर’ नावाने तयार केले बनावट फेसबुक आयडी, लुबाडले अनेकांकडून पैसे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 21:51 IST

Cyber Crime : सायबर गुन्हेगारीचे थेट पोलिसांनाच आव्हान

ठळक मुद्देया चोऱ्यांचा छडा लावण्यात व्यस्त असलेल्या चंद्रपूर पोलिसांनाच सायबर गुन्हेगारीने ‘एसपी चंद्रपूर’ या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करून थेट आव्हान दिले आहे.

चंद्रपूर : दररोज मोबाईलवर कोणते ना कोणते कारण सांगून बॅंक खात्यातील रकमेच्या मोठ्या प्रमाणावर चोऱ्या सुरू आहे. याचा तपास लावण्यासाठी पोलीस खात्याने सायबर सेल तयार केले. या चोऱ्यांचा छडा लावण्यात व्यस्त असलेल्या चंद्रपूर पोलिसांनाच सायबर गुन्हेगारीने ‘एसपी चंद्रपूर’ या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करून थेट आव्हान दिले आहे.एसपी चंद्रपूर या बनावट फेसबुक आयडीवरून सुरुवातीला अधिकृत फेसबुकमधील फेसबुक मित्रांना फ्रेन्डस रिक्वेस्ट पाठविले गेले. त्यांना आर्थिक अडचणी सांगून गुगुल पे व फोन पे द्वारे पैसे पाठविण्यासाठी विनंती करीत असल्याची धक्कादायक बाब सायबर सेलच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केलेला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली.इंटरनेट वापरकर्ते सायबर गुन्हेगारांचे लक्ष्यसायबर गुन्हेगार इंटरनेटवरील वापरकर्त्यांचे वर्तन तपासून त्यांची फसवणूक करीत आहे. यातही ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण मुले-मुली यांना लक्ष्य केले जात आहे. सायबर गुन्ह्यांबाबत समाजात नसलेली जागृकता कारणीभूत असल्याची बाब पोलीस अधीक्षक साळवे यांनी अधोरेखित केली. सोशल मीडियाद्वारे बनावट फेसबुक प्रोफाईल, मॅसेंजर तयार करून पैशाची मागणी, व्हॉटस?पद्वारे चॅटींग करून ब्लॅकमेलींग, आॅनलाईन वॉलेटची, क्रेडीट कार्डची केवायसी, नोकरीचे आमिष अशी विविध कारणांचा आधार घेऊन सर्व सामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचे पोलीस अधीक्षक साळवे यांनी सांगितले.खोट्या शापिंग वेबसाईटही गुन्हेगारांचा अड्डा

लॉकडाऊनच्या काळात आॅनलाईन खरेदीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जास्तीत जास्त लोकांनी विविध प्रकारचे पेमेंट आॅनलाईन करण्यावर भर दिला. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार खोट्या शॉपिंग वेबसाईट तयार करण्यावर भर देत आहे.लॉकडाऊनच्या काळात नोकरी गमावलेल्या व्यक्तींना सरकारकडून भत्ता मिळेल, अशी आमिषे दाखविली जात आहे. हीही काळजी घ्यावीकोणत्याही संशयित लिंकवर क्लीक न करणे, अनोळखी ई-मेलच्या अटॅचमेंट फाईल डाऊनलोड न करणे, कोणत्याही वेबसाईटला भेट देताना वेबसाईट स्पेलींग पुन्हा-पुन्हा तपासणे, काहीवेळा स्पेलींगमध्ये थोडा बदल करून बनावट वेबसाईट तयार केल्या जात आहे.फसवणूक होताच व शंका येताच १०० डायल करानागरिकांनी सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये, तरीही अशी फसवणूक झाली वा होण्याची शंका येताच पोलीस नियंत्रण कक्षाला १०० या क्रमांकावर कॉल करून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमFacebookफेसबुकPoliceपोलिस