शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना दिली बनावट क्रिप्टो करन्सी; मॉरिस क्रिप्टो कंपनीची १४ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 06:25 IST

दैनंदिन व्याजाचेही आमिष 

मुंबई : ग्राहकांना बनावट क्रिप्टो करन्सी वितरित करत त्यावर दिवसाकाठी किमान २ ते ३ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविल्याप्रकरणी मॉरिस क्रिप्टो करन्सी कंपनीची १४ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) सोमवारी जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये कंपनीच्या बँक खात्यातील रोख रक्कम, कोची येथील एक रुग्णालय आणि तामिळनाडू येथील ५२ एकर शेतजमीन यांचा समावेश आहे. 

ईडीच्या प्रसिद्ध पत्रकानुसार, मॉरिस कंपनीने क्रिप्टो कंपनीसोबतच आपल्या अन्य दोन कंपन्यांच्या माध्यमातून देशभरातील सामान्य ग्राहकांसमोर गुंतवणुकीच्या विविध योजना सादर केल्या. याचाच भाग म्हणून क्रिप्टो करन्सीची देखील योजना सादर केली. या योजनेचा प्रसार झपाट्याने व्हावा आणि अधिकाधिक गुंतवणूक व्हावी म्हणून ग्राहकांना दिवसाकाठी २ ते ३ टक्के व्याज देण्याचेही आमिष दिले. कंपनीच्या या योजनेला भुलून त्यामध्ये हजारो लोकांनी गुंतवणूक केली. मात्र, काही काळानंतर परतावा मिळणे बंद झाल्यानंतर अनेक ग्राहकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 

अनेक ठिकाणी तक्रारीकंपनीच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या. यातील आर्थिक व्याप्ती वाढल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने याचा तपास सुरू केला आणि देशातील अनेक प्रमुख शहरांतून छापेमारी केली. यादरम्यान ईडीला मिळालेल्या कागदपत्रांवरून, मॉरिस कंपनीने बाजारात आणलेली क्रिप्टो करन्सी ही बनावट असल्याचे निदर्शनास आले. तसेच, कंपनीने क्रिप्टो तसेच अन्य गुंतवणूक योजनांद्वारे जमा केलेले पैसे हे काही बनावट कंपन्या स्थापन करून त्यामध्ये हे पैसे वळवत त्याचा व्यक्तिगत वापर सुरू केल्याचेही निदर्शनास आले. 

  • कारवाईच्या पहिल्या टप्प्यात ईडीने कंपनीची ३६ कोटी ७२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा केलेल्या छापेमारीमध्ये १४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. 
  • आतापर्यंत कंपनीची सुमारे ५० कोटी ७२ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केलेली आहे. तसेच, या प्रकरणी मॉरिस क्रिप्टो करन्सी कंपनीच्या दोन मालकांसह अन्य चार जणांना या प्रकरणात अटक केली आहे.
टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारीCryptocurrencyक्रिप्टोकरन्सी