शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फेक न्यूज पसरवण्यात व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत फेसबुकची आघाडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 06:44 IST

राज्यात ५५२ गुन्ह्यांची नोंद

मनीषा म्हात्रे 

मुंबई : कोरोनाबाबत अफवांचे पीक वाढू लागले असून, त्याला धार्मिक रंग चढवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न जोर धरत आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यभरात तब्बल ५५२ गुन्हे नोंद झाले आहेत. यात बीडची आघाडी आहे. राज्याच्या सायबर विभागाने केलेल्या अभ्यासावरून सर्वाधिक अफवा व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. सद्यस्थितीत व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत फेसबुकवरून अफवांचा जोर वाढत असल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या आकडेवारीतून पाहावयास मिळते आहे. त्यानुसार सायबर विभाग फेसबुकवरील हालचालींवर विशेष लक्ष ठेवून आहे.

या गुन्ह्यांचा अभ्यास करता त्यातील फेसबुकवर टाकलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून २३४ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याखालोखाल व्हॉट्सअ‍ॅपसंबंधित २०८ प्रकरणे आहेत. तर यात टिष्ट्वटर १८, इन्स्टाग्राम ४ तर टिकटॉक २८ गुन्ह्यांचा समावेश आहे़ विविध कारवायांत २८८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

२३२ आरोपींची ओळख पटली असून, त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. आतापर्यंत १४६ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर १२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलीसपत्रकही व्हायरल...

याच काळात शासन आदेशाबरोबरच पोलीस पत्रकात फेरफार करत ते पत्रक व्हायरल करण्यात आले. त्यामुळेही गोंधळ निर्माण झाला होता.

सेलिब्रिटींना कोरोना झाल्याची जोरदार चर्चा

सेलिब्रिटी, राजकीय मंडळींसह नामांकित व्यक्तींना कोरोना झाल्याच्या अफवांनी जोर धरला.

११८ आक्षेपार्ह पोस्ट डिलीट

सायबर पोलिसांकड़ून करण्यात आलेल्या विविध कारवायांत तब्बल ११८ आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :FacebookफेसबुकCrime Newsगुन्हेगारी