शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकच्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 20:55 IST

अंखी दास यांनी रविवारी तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्दे14 ऑगस्ट रोजी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखासंदर्भात ही धमकी देण्यात आली आहे.

फेसबुक इंडियाच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अंखी दास यांनी दिल्ली पोलिसांत धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. अंखी दास यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात येत होती, त्यामुळे त्यांनी सोमवारी तक्रार दाखल केली आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांच्या तक्रारीनुसार सायबर सेल युनिट काम करत आहे.

अंखी दास यांनी रविवारी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी असा आरोप केला आहे की, काही लोक ऑनलाइन पोस्ट करून जीवे मारण्याची धमकी देत ​​आहेत आणि त्यांच्याबद्दल अश्लील कमेंट करीत आहेत. तक्रारीनुसार, 14 ऑगस्ट रोजी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखासंदर्भात ही धमकी देण्यात आली आहे. लेख प्रसिद्ध झाल्यापासून आपल्याला धमक्या मिळत असल्याचे अंखी दास यांनी आपल्या  तक्रारीत म्हटले आहे.

याचबरोबर, तक्रारीत अंखी दास यांनी म्हटले आहे की, ऑनलाईन कंटेंटद्वारे आपल्यासह कुटुंबीयांचा जिवाला धोका आहे. तसेच, कंटेंटमध्ये एका वृत्तपत्रातील लेखाच्या आधारे आपली प्रतिष्ठा कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा सुद्धा अंखी दास यांनी केला आहे. याशिवाय, आरोपीकडून राजकीय संबंधामुळे जाणीवपूर्वक आपला अपमान केला आणि आता ऑनलाईन आणि ऑफलाईन धमकी देण्यात आली आहे. हे आपली प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप अंखी दास यांनी केला आहे.

दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रात फेसबुकवर प्रसिद्ध झालेल्या लेखावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. 

टॅग्स :FacebookफेसबुकCrime Newsगुन्हेगारी