शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘त्या’ मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तयार केला चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 13:09 IST

मुलुंड हत्याप्रकरण; पोलिसांनी घेतली न्यायवैद्यक पथकाची मदत

ठळक मुद्देअर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या तरुणाची ओळख पटविण्यासाठी केईएमच्या न्यायवैद्यक पथकाने तरुणाच्या कवटीच्या आधारे चेहरा तयार केला आहे.त्यांनी केईएमच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर करून मृतदेहाच्या कवटीच्या आधारे त्याचा चेहरा तयार केला.

मुंबई - मुलुंडच्या केळकर महाविद्यालयालगत असलेल्या झुडपात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या तरुणाची ओळख पटविण्यासाठी केईएमच्या न्यायवैद्यक पथकाने तरुणाच्या कवटीच्या आधारे चेहरा तयार केला आहे. त्यानुसार, नवघर पोलीस अधिक तपास करत आहेत.मुलुंडमधील केळकर महाविद्यालयाच्या मागे असलेल्या स्मशानभूमीजवळील ओसाड जागेत २७ जानेवारी रोजी हा मृतदेह आढळून आला होता. ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा जाळण्यात आला होता. या प्रकरणी अज्ञाताविरोधात हत्या करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नवघर पोलिसांनी दाखल केला. त्यानंतर मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरातील हरविलेल्यांच्या नोंदीद्वारे त्यांनी तपास सुरू केला. राज्यभरातील पोलीस विभागांना याबाबत कळविण्यात आले. बेपत्ता असल्याच्या काही दाखल तक्रारींनुसार तक्रारदारांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यातून काहीच हाती आले नाही.अखेर, त्यांनी केईएमच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर करून मृतदेहाच्या कवटीच्या आधारे त्याचा चेहरा तयार केला. त्यानुसार जवळपास ६० टक्के मृत व्यक्ती तशी दिसत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा चेहरा आणि मृतदेहाचे फोटो असलेली ५ हजार पत्रके नवघर पोलीस मुंबईतील गर्दी तसेच झोपडपट्टी विभागात लावणार आहेत. पत्रकातील संबंधित व्यक्तीशी मिळतीजुळती काहीही माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKEM Hospitalकेईएम रुग्णालय