व्यापाऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा धमकी देत खंडणी उकळणाऱ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 09:42 PM2019-10-15T21:42:12+5:302019-10-15T21:43:11+5:30

पैशांच्या हव्यासापोटी या दोघांनी हे कृत्य केल्याचे कबूली जबाब पोलिसांना दिला आहे. 

Extortionist arrested for threatening businessman for ransom | व्यापाऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा धमकी देत खंडणी उकळणाऱ्यांना अटक

व्यापाऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा धमकी देत खंडणी उकळणाऱ्यांना अटक

Next
ठळक मुद्दे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा गुन्हे शाखा कक्ष -१२ कडे वर्ग करण्यात आला. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष १२ च्या पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई -  दहिसर परिसरातील व्यापाऱ्याची गाडी चोरून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष १२ च्या पोलिसांनीअटक केली आहे. पैशांच्या हव्यासापोटी या दोघांनी हे कृत्य केल्याचे कबूली जबाब पोलिसांना दिला आहे. 

दहिसर परिसरात व्यापाऱ्याचा व्यवसाय असून त्याच्याकडे आरोपी चालक हा कामाला होता. दररोज व्यापाऱ्यासोबत फिरत असल्याने चालकाने व्यापाऱ्याकडून होणाऱ्या पैशाची मोठी उलाढाल पाहिली होती. त्यानुसार हव्यासापोटी मित्रांच्या मदतीने व्यापाऱ्याला गंडा घालण्याचं ठरवलं. त्यानुसार चालकाने व्यापाऱ्याची महागडी गाडी पळवून त्याच्याजवळ दीड लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास गाडी भंगारात तोडण्यासाठी देण्याची चालक धमकी देऊ लागला. त्यानुसार मालकाने दीड लाखांचा चेक दिला. एवढ्यावरच न थांबता त्या चालकाने मित्राच्या मदतीने व्यापाऱ्याला गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. दोघांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढू लागल्यानंतर व्यापाऱ्याने बोरिवली पोलिसात तक्रार नोंदवली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा गुन्हे शाखा कक्ष -१२ कडे वर्ग करण्यात आला. तपास करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. 

Web Title: Extortionist arrested for threatening businessman for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.