शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीत 'हाय प्रोफाईल' सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; चार तरुणींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 12:18 IST

एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या नावाखली वेश्याव्यवसाय 

ठळक मुद्देहॉटेलमधील कुंटणखाण्यावर छापा;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : सोशल मीडियावरून एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या नावाखाली हिंजवडी येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाख युनिट चारच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. चार तरुणींची सुटका करून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

गणेश कैलास पवार (वय २०, सध्या रा. येळवंडे वस्ती, हिंजवडी, मुळगाव सताळ पिंपरी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद, युसुफ सरदार शेख तसचे हिरा (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यांच्या समुळ उच्चाटनासाठी झिरो टॉलरन्स मोहीम अंतर्गत धडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. 

हिंजवडी फेज एकमधील लक्ष्मी चौकालगतच्या येळवडे वस्ती येथील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत येथे काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतला जात आहे, अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने एका बनावट ग्राहकास पाठवून खात्री केल्यावर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. तेथे चार तरुणींना डांबून ठेवले असल्याचे निदर्शनास आले. अटक केलेला आरोपी गणेश पवार हा या हॉटेलचा मॅनेजर असून तो व इतर आरोपी हे गेल्या सात ते आठ दिवसांपासून या लॉजमध्ये या तरुणींकडून जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होते. पोलिसांनी या तरुणींची सुटका केली. त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना रेस्क्यु फौंडेशन, संरक्षण गृह, मोहम्मदवाडी, पुणे येथे रवाना करण्यात आले. 

युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोंविद चव्हाण यांच्या पथकाने ही कामगि

टॅग्स :hinjawadiहिंजवडीCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसArrestअटक