शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरून जाळ्यात ओढून फसवणाऱ्यांचा पर्दाफाश; व्हिडीओ कॉल घेऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 07:32 IST

या मंडळींनी २५० हून अधिक जणांचे अश्लील व्हिडीओ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ८० पेक्षा जास्त लोकांना विकल्याची माहिती समोर आली

मुंबई : सोशल मीडियावरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. पुढे व्हॉट्सॲप क्रमांक शेअर होताच तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ कॉल आला. अश्लील संवाद रंगला आणि तरुणीच्या मधाळ बोलण्याच्या जाळ्यात अडकून तोही विवस्त्र झाला. पुढे याच व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात ५ जणांवर कारवाई करण्यात आली.

या मंडळींनी २५० हून अधिक जणांचे अश्लील व्हिडीओ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ८० पेक्षा जास्त लोकांना विकल्याची माहिती समोर आली. यात देशभरातील उच्चभ्रू तसेच उच्चशिक्षित मंडळी त्यांच्या जाळ्यात अडकली आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशी फसवणूक करणाऱ्या मंडळीच्या तक्रारी वाढत होत्या. त्यांनी फसवणुकीसाठी मुलींच्या नावे ट्वीटरची ५, इंस्टाग्रामची ४ व फेसबुकवर ३ असे एकूण १२ फेक अकाउंट उघडले होते.

आतापर्यंत या टोळीने राज्यभरात २५० जणांचे अश्लील व्हिडीओ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ८० पेक्षा जास्त लोकांना विक्री केले. विक्री करताना स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्यांनी टेलिग्रामचा वापर केला. या प्रकरणात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश व ओडिशातील ५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. आरोपींकडून ६ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.

नेपाळ कनेक्शनआरोपींनी सेक्सटॉर्शनद्वारे मिळणारी रक्कम स्वीकारण्यासाठी उघडलेल्या बँक अकाउंटसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला. तसेच आर्थिक व्यवहारासाठी भारताव्यतिरिक्त नेपाळमधील बँक खात्याचाही वापर करण्यात आला आहे. 

व्हिडीओ कॉल घेऊ नकाव्हाॅट्सॲपवर येणारे अनोळखी व्हिडीओ कॉल उचलू नका अथवा त्यावर कुठलाही प्रतिसाद देऊ नका असे आवाहन सायबर पोलिसांनी केले. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस