शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गरीब महिलांची परराज्यात विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 15:30 IST

जुलै महिन्यात बेपत्ता झालेल्या विवाहितेची केली सुटका

ठळक मुद्देनोकरीची बतावणी देत घेऊन जात परराज्यात मध्यप्रदेशात केली कारवाई

औरंगाबाद : गरीब आणि गरजू महिलांना केटरिंगच्या कामाला जायचे असल्याची बतावणी करून लाखो रुपयांना त्यांची परराज्यात विक्री करणाऱ्या रॅकेटचा जवाहरनगर पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला. एवढेच नव्हे, तर मध्यप्रदेशात विक्री केलेल्या २४ वर्षीय विवाहितेची मुक्तता केली.

याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात रॅकेटमधील आरोपींविराधोत गुन्हा नोंदवून दोन महिलांना अटक केली. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. रंजना जोगदंड आणि जिजाबाई शिंदे, अशी अटकेतील आरोपी महिलांची नावे आहेत. जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र जाधव यांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील हनुमाननगर येथील रहिवासी दोन महिला जुलै महिन्यात बेपत्ता झाल्या होत्या. याविषयी जवाहनगर ठाण्यात एका महिलेच्या आईने तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. गरीब आणि गरजू महिलांना परराज्यात केटरिंग अथवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये कामाला लावते, एका महिन्याच्या कामासाठी २५ ते ३० हजार रुपये मिळतील, अशी बतावणी करून आणि मध्यप्रदेश राजस्थानमध्ये नेऊन विक्री करतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. 

पोलिसांनी संशयावरून आरोपी रंजना जोगदंड हिला ताब्यात घेतले. तेव्हा तिने सांगितले की, गारखेड्यातील दोन तरुणींना तिने जिजाबाईच्या ताब्यात दिले. पोलिसांनी बोलावून जिजाबाईची कसून चौकशी केली असता शिवाजी धनेधर याच्यासोबत कामाकरिता दोन्ही महिलांना पाठविल्याचे सांगितले. पोलिसांनी शिवाजीशी संपर्क साधला असता आठ दिवसांत त्या परत येतील, असे सांगून त्याने त्याचा मोबाईल बंद केला. अधिक तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपींनी दोन्ही महिलांना मध्यप्रदेशात प्रत्येकी एक ते दीड लाखींत विकल्याचे समजले.

पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे, उपनिरीक्षक भरत पाचोळे, कर्मचारी दत्तात्रय बोटके, संदीप जाधव, समाधान काळे, महिला कर्मचारी दीपाली कोहचाडे यांचे पथक  मकला (ता. महीदपूर, जि. उज्जैन, मध्यप्रदेश) येथे  गेले. तेव्हा तेथील एका तरुणासोबत तिचा विवाह लावण्यात आल्याचे समजले. या बदल्यात त्या तरुणाने सीमाचा मामा असल्याची बतावणी करणाऱ्या धनेधर याला एक लाख रुपये दिल्याचे समजले. तेव्हापासून सीमाला तिच्या नवऱ्याने डांबून ठेवल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी तिची तेथून मुक्तता केली आणि तिला औरंगाबादला आणले.

आरोपींना घेतले ताब्यातसीमाची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी लगेच आरोपी जिजाबाई आणि रंजनाबाई यांना अटक केली. शिवाय आरोपी धनेधरचा शोध सुरू केला. या रॅकेटने आतापर्यंत अनेक महिलांची परराज्यात विक्री केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादKidnappingअपहरणWomenमहिलाPoliceपोलिस