शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टात स्फोट झाल्याने एकच खळबळ; स्‍पेशल सेल-NSG आणि फॉरेंसिक टीम पोहोचली अन् रिकामी केला परिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 18:34 IST

Explosion in the rohini court : जखमींना जवळच्या आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी कोर्ट परिसर रिकामी केला असून कोर्टाचे दरवाजे बंद करून घेतले आहेत.

नवी दिल्लीदिल्लीतील रोहिणी कोर्टात आज सकाळी कमी तीव्रतेचा स्फोट झाला. यानंतर कोर्टात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या स्फोटात २ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना जवळच्या आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी कोर्ट परिसर रिकामी केला असून कोर्टाचे दरवाजे बंद करून घेतले आहेत.

दिल्लीतील रोहिणी कोर्ट रूम नंबर १०२ मध्ये स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. तेव्हापासून कोर्टात सुरू असलेल्या खटल्यांची केवळ सुनावणी थांबण्यात आली आणि दिल्ली पोलीस, फॉरेन्सिक टीम तपास करत आहे. त्याचवेळी, न्यायालय क्रमांक १०२ चे नायब न्यायालय (पोलीस) या घटनेत जखमी झाले असून त्यांना आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोहिणी कोर्टात झालेला स्फोट हा कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट आहे. हा एक प्रकारचा क्रूड बॉम्ब आहे. त्याचवेळी घटनास्थळावरून आयईडी, स्फोटक आणि टिफिनसारखी वस्तू सापडली आहे. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल तपास करत आहे. त्याचवेळी एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड)लाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

स्पेशल सेलला घटनास्थळावरून या वस्तू मिळाल्यादिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या तपासात असे दिसून आले आहे की,रोहिणी कोर्टात कथित लॅपटॉप स्फोटाजवळ काही पांढर्‍या पावडरसारखी सामग्री विखुरली गेली होती आणि फाइलमध्ये कोणतीही कायदेशीर कागदपत्रे किंवा न्यायालयाशी संबंधित कागदपत्रे नाहीत तर फक्त पांढरी पाने आहेत. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलसह एनएसजी आणि फॉरेन्सिक टीमने तळ ठोकला आहे.अग्निशमन विभागाला सकाळी 10:40 वाजता माहिती मिळालीदिल्ली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी कोर्टात सकाळी 10:40 वाजता स्फोट झाल्याचा कॉल आला. यानंतर अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. तर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घालून सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. त्यामुळे रोहिणी न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्याची सुनावणी थांबवण्यात आली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिसBlastस्फोटdelhiदिल्लीFire Brigadeअग्निशमन दल