शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

‘त्या’ महागडया मोबाईने फोडले बिंग, घरफोडीच्या गुन्हयातील सराईत चोरटा गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 23:33 IST

House Breaking Case : रेकी करून करायचा चोऱ्या

डोंबिवली:  घरफोडी गुन्हयातील सुरज रामदास चव्हाण या सराईत चोरटयाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. ठाकुर्ली 90 फिट रोडवर पोलिसांनी गस्ती दरम्यान संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता दोन महागडे मोबाईल त्याच्याकडे आढळुन आले. पडताळणी केली असता ते एका मोबाईल शॉपच्या घरफोडीच्या गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले. यावरून त्याला अटक केली असता त्याच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

28 ऑगस्टला मध्यरात्री डोंबिवली पूर्वेकडील आगरकर रोडवर महावीर नॉव्हेल्टी मोबाईल शॉपचे टाळे तोडून चोरटयांनी 7 महागडे मोबाईल आणि रोकड असा 97 हजार 569 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. हा चोरीचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला होता. दरम्यान मंगळवारी रात्री पोलिस उपनिरिक्षक दिपक दाभाडे, पोलिस हवालदार शंकर निवळे, पोलिस नाईक विशाल वाघ, गणेश गिते, सोमनाथ पिचड, दिलीप कोती, वैजीनाथ रावखंडे, जालींदर साळुंखे, निलेश पाटील आदि पोलिसांचे पथक शहरात गस्त घालत असताना 90 फिट रोडवर  त्यांना एकजण संशयतरित्या फिरताना आढळुन आला. तेव्हा त्याच्याकडे दोन महागडे मोबाईल आढळुन आले. संबंधित व्यक्तीला पोलिसी खाक्या दाखविताच आगरकर रोडवर मोबाईल शॉपमध्ये घरफोडी केल्याची त्याने कबुली दिली. दरम्यान पुढच्या तपासात त्याच्याकडून डोंबिवलीसह ठाणो, कल्याण, मुंबई याठिकाणचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात रामनगर पोलिसांना यश आले.  त्याच्याकडून पाच मोबाईल, टिव्ही, रोकड असा 1 लाख 7 हजार 269 रूपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईत त्याच्याविरोधात 16 चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे यांनी दिली. चव्हाण हा सराईत गुन्हेगार असल्याने मुंबईतून तो काही वर्षे तडीपार होता. तो सध्या खडवली येथे वास्तव्याला होता. घरफोडीच्या गुन्हयातील सराईत असलेला सूरज हा वयाच्या 12 व्या वर्षापासून चोरीचे गुन्हे करीत आहे. तो रेकी करून घरफोडी करायचा. त्याने आणखीन किती गुन्हे केले आहेत याचा तपास सुरू आहे. त्याला 4 सप्टेंबरपर्यंत कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहीती मोरे यांनी दिली.

टॅग्स :ArrestअटकdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसRobberyचोरीMobileमोबाइल