शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात जामीनासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा पदाफार्श; १३ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 14:52 IST

२२ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : न्यायालयात जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करणार्‍या टोळ्यांचा पुणेपोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात एकावेळी छापे घालून पोलिसांनी १३ जणांना अटक केली. तसेच २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले गेले आहेत. 

शिवाजीनगर, लष्कर, वडगाव यासह वेगवेगळ्या न्यायालयात चोरी, जबरी चोरी, घरफोड्या, दरोडा आणि पॉस्को सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करुन ते न्यायालयात सादर करत असे. यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड आणि सात बारा उतारे बनावट तयार केली जात.

ती जामिनासाठी न्यायालयात सादर करुन जामीन मिळवून दिला जात असे. जामीन मिळाल्यावर हे आरोपी पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात पुढील तारखांना हजर रहात नसत. त्यांची गुन्हेगारी कृत्ये मात्र सुरु रहात होती.  याबाबतची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली. त्यानुसार परिक्षाविधीन पोलीस अधिकार्‍यांच्या पथकाने शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात मंगळवारी दुपारी एकाचवेळी सर्व बाजूने साध्या वेशात वेढा दिला. आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या या आरोपींना ताब्यात घेतले. 

लष्कर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रदीप साखरे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी निलेश नंदकुमार शहाणे (वय २७, रा. दत्तवाडी), महारुद मंदरे (वय २६, रा. माणिकबाग), असिफ शेख (वय २७, रा. क़ात्रज), मोहसिन सय्यद (वय ४८, रा. दळवीनगर, निगडी), रशिद सय्यद (वय ४९, रा. शांतीनगर), अमीर मुलाणी (वय ४४, रा. चिंचवड) यांना अटक करण्यात आली असून रणजित सूर्यवंशी आणि गोपाळ कांगणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट ४ पासून काही अंतरावर एका एजंटला पोलिसांनी पकडले. नागेश माणिक बनसोडे (वय ३९, रा. पिंपरी) याला अटक केली आहे. तसेच भावेश शिंदे (वय ३३, रा. सोलापूर बाजार, वानवडी), विकी पुडगे (वय २८, रा. पिंपळेनगर, सांगवी), कल्पेश इंगोले (वय १८), सोनू  अशोक जगधने (वय २९, रा. पुणे रेल्वे स्टेशन), शशांक साळवी (वय ३१, रा. दापोडी), शुभम लांडगे (वय १९, रा. देहुरोड) यांना अटक करण्यात आली आहे.याशिवाय दाविद पहिलवान (वय २७, रा.दापोडी), विशाल गरड (वय ३३, रा.आनंदनगर, चिंचवड), विलास धेंडे (वय ५७, रा.पर्वतीदर्शन) सुरेश डेंगळे (वय २५, रा.चिखली), प्रमोद जगताप (वय ५८, रा.बारामती), प्रविण ससाणे (वय ४४, रा.बालेवाडी फाटा), मारुती कुदळे (वय ४३, रा.नाना पेठ), रणजित सूर्यवंशी आणि गोपाळ कांगणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस