शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

त्र्यंबकेश्वर फिरविण्याच्या बहाणा; गुंगीचे औषध पाजून अल्पवयीन मुलीवर शारिरिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 3:22 PM

पोलिसांनी संशयित रोहितविरुध्द बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे

ठळक मुद्देसंशयित रोहितविरुध्द बलात्कार, पोस्कोनुसार गुन्हा

नाशिक : शहरापासून अवघ्या २८ किलोमीटर अंतरावरील त्र्यंबकेश्वर येथे फिरण्याचा बहाणा करत एका वासनांध संशयित तरुणाने अल्पवयीन मुलीला पंचवटीतून दुचाकीवर बसवून नेले. तेथील एका लॉजवर शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

त्र्यंबकेश्वर परिसरात तीन दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. येथील निसर्गसौंदर्य बहरले आहे. पोलिसांनी या भागातील पर्यटनकेंद्रांवर येण्यास पर्यटकांना मज्जाव घातला आहे. वीकेण्डला या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे बहुतांश पर्यटकांना पोलिसांकडून माघारी धाडले जात होते. पोलिसांची नजर चुकवित पंचवटी भागातील संशयित रोहित आनंद म्हसदे (२५,रा.फुलेनगर, पंचवटी) हा एका अल्पवयीन मुलीला फुस लावून त्र्यंबकेश्वरला फिरुन येण्याच्या बहाण्याने घेऊन गेला.

फिर्यादी पिडित अल्पवयीन मुलगी आणि संशयित रोहित हा एकाच ठिकाणी कामाला असल्याने ते एकमेकांच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहित याने त्र्यंबकेश्वरमध्ये पोहचल्यानंतर येथील एका हॉटेलवजा लॉजमध्ये अल्पवयीन मुलीला घेऊन जात तिला शितपेय पाजण्याचा बनाव करत त्यामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयित रोहितविरुध्द बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास महिला उपनिरिक्षक डी.एस.पाटील या करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकWomenमहिलाtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर