शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलिसांची उत्तम कामगिरी; कन्हैया लाल हत्येचा निषेध करणाऱ्या मुलीला धमकी देणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 12:52 IST

Kanhaiya Lal Murder Case : ही कारवाई व्ही. पी. रोड पोलिसांनी केली असून अधिक तपास सुरू आहे.

मुंबई :भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याच्या रागात राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ सोशल मीडियावर मजकूर लिहिणाऱ्या मुंबईतील १५ वर्षीय मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला जम्मू काश्मीर येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई व्ही. पी. रोड पोलिसांनी केली असून अधिक तपास सुरू आहे.

मुलीने कन्हैयालाल यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर  तिचे विचार मांडले. हा मजकूर लिहिल्यापासून १ जुलैपासून तिला अनोळखी व्यक्तींकडून कॉल तसेच संदेश येण्यास सुरुवात झाली.  तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. कन्हैयालाल यांचे समर्थन करण्याचा वाईट परिणाम होईल आणि तुझीही अवस्था तशीच केली जाईल, अशी धमकी तिला देण्यात आली. याची माहिती मुलीने वडिलांना देताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. 

याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर व्ही. पी. रोड पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. त्यासाठी आरोपीने तीन विविध मोबाईल क्रमांकांचा वापर केला होता. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. पी. रोड पोलिसांनी फयाज अहमद गुलाम मोहम्मद भट (३०) याला जम्मू काश्मीरच्या बडगाम येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबईJammu Kashmirजम्मू-काश्मीर