शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्कृत्य! मुलासमोर आईवर नराधमांनी केला गँगरेप, पतीने विरोध केल्याने केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 17:05 IST

Gangrape Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी संपूर्ण राज्यात असे दुष्कृत्य घडवून आणत होती. एवढेच नाही तर या टोळक्याने ३० हून अधिक बलात्काराच्या घटना घडवल्या होत्या.

आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये चार महिन्यांपूर्वी सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. येथे पतीसमोर पत्नीवर अत्याचार करण्यात आला. घटनेवेळी पीडित महिलेचा मुलगाही तिथे होता. नवरा विनवणी करत राहिला पण नराधमाने ऐकले नाही. मुलगा देखील आईला सोडण्याची विनवणी करत राहिला, पण आरोपीला काही फरक पडला नाही. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 4 महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी संपूर्ण राज्यात असे दुष्कृत्य घडवून आणत होती. एवढेच नाही तर या टोळक्याने ३० हून अधिक बलात्काराच्या घटना घडवल्या होत्या. तसेच, गेल्या काही दिवसांपासून गुंटूर जिल्ह्यात राहणाऱ्या या टोळक्याने घडवलेल्या चोरीच्या लागोपाठ घटनांमुळे पोलिसांची झोप उडवली होती.सप्टेंबरमध्ये गुंटूरच्या मेडिकोंडूर पोलीस स्टेशन हद्दीतील पलाडुगु साइड रोडवरील सट्टानापल्ली  येथील एका जोडप्यावर या टोळीने हल्ला केला होता. आरोपींनी आधी पतीला बेदम मारहाण केली. त्यानंतर पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. एवढेच नाही तर आरोपींनी आणखी दोन जोडप्यांना लक्ष्य केले.गुंटूर जिल्हा पोलिसांनी सांगितले की, टोळीतील गुंडांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या टोळीने दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका कुटुंबाला अडवून बेदम मारहाण केली. मुलासमोरच त्याने आईसोबत क्रूर कृत्य केले. पतीने विरोध केल्यानंतर त्याला बेदम मारहाण केली.घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि बोटांच्या ठशांच्या आधारे टोळीचा सदस्य कुरनूल जिल्ह्यातील पन्याम भागातील रहिवासी असल्याचे समजले. पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचले असता हे लोक शेतात काम करणारे मजूर असल्याचा  बहाणा करत असल्याचे समोर आले. गुंटूर ग्रामीणचे एसपी विशाल गुन्नी यांनी सांगितले की, पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. सध्या २ आरोपी फरार आहेत. आरोपींनी राज्यात ३० हून अधिक बलात्कार आणि लुटमार केल्याची कबुली दिली आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसAndhra Pradeshआंध्र प्रदेशArrestअटक