शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

इस्टेट एजंट बनला साखळी चोर; लॉकडाऊनमुळे गुन्हेगारी मार्ग अवलंबिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 23:43 IST

लॉकडाऊन काळात आर्थिक नुकसान झाल्याने अनेकजण अडचणीत आले आहे.

ठळक मुद्देसमर्थ पोलिसांनी आरोपीला केली अटक

पुणे : लॉकडाऊनच्या काळात अनेकांची आर्थिक कोंडी झाल्याने काही जणांनी गळफास जवळ केला तर काहींनी पर्यायी कामाचा विचार करुन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही जण थेट गुन्हेगारीकडे वळले. अशाच परिस्थितीने गांजलेल्या इस्टेट एजंटने चक्क सोनसाखळी चोरी केली. मात्र, समर्थ पोलिसांनी त्याला तासाभरात अटक केली. तेव्हा त्याने आपण आर्थिक कारणामुळे चोरी केल्याची कबुली दिली. मोहम्मद आतिफ इक्बाल शेख (वय २६, रा. नाना पेठ) असे या एजंटचे नाव आहे. भाजी आणण्यासाठी जात असलेल्या ज्येष्ठ महिलेचे पाठलाग करुन त्यांचे ३५ हजार रुपयांचे मंगळसुत्र हिसकावून चोरुन नेले होते. हा प्रकार रस्ता पेठेतील गृहलक्ष्मी अपार्टमेंटसमोर मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कपुरे, हवालदार साहिल शेख, संतोष काळे, निलेश साबळे, प्रमोद टिळेकर, सुमित कुट्टे, स्वप्नील वाघोले यांच्या पथकाने शोध सुरु केला. आरोपीने हिरव्या रंगाच्या स्कुटरचा वापर केल्याची माहिती मिळाली. यावरुन पोलिसांनी हिरव्या रंगाची स्कुटर व दागिन्यांच्या दुकानांची तपासणी सुरु केली. परिसरातील फोन कॉलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यात शेख याचा नंबर शोधण्यात यश आले. शेख दागिने विकण्यासाठी नाना पेठेतील ज्वेलर्समध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून त्याला  ताब्यात घेतले. त्याच्याकडील दागिने काढून दाखविल्यावर फिर्यादी यांनी ते आपलेच असल्याचे सांगितले.शेख हा नाना पेठ आणि कॅम्प परिसरात रियल इस्टेट एजंटचा व्यवसाय करतो. लॉकडाऊनच्या काळात त्याचा व्यवसाय कमी झाला होता. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक चणचण जाणवत होती. त्यामुळे त्याने ज्येष्ठ महिलेचे मंगळसुत्र हिसकाविल्याचे समोर आले. आतिफ शेख याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक