Enraged by classmates friendship with another man Andhra student strangles her to death | तू त्याच्याशी मैत्री का केलीस?; संतापलेल्या विद्यार्थ्यानं गळा दाबून केली मैत्रिणीची हत्या

तू त्याच्याशी मैत्री का केलीस?; संतापलेल्या विद्यार्थ्यानं गळा दाबून केली मैत्रिणीची हत्या

गुंटूर: महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकरणाऱ्या तरुणीची तिच्याच मित्रानं हत्या केल्याची घटना आंध्र प्रदेशातल्या गुंटूरमध्ये घडली आहे. अनुषा असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. ती नरासराओपेट इथल्या कृष्णवेणी पदवी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. अनुषानं तिच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याशी मैत्री केली. ही गोष्ट तिचा मित्र असलेल्या विष्णूवर्धन रेड्डीला आवडली नाही. त्यामुळे विष्णूवर्धननं अनुषाची गळा दाबून हत्या केली.

भयंकर! शेजाऱ्याचं काळीज चिरुन बटाट्यांसोबत शिजवलं, घरच्यांनाही खायला घातलं

अनुषानं वर्गातल्या मुलाशी मैत्री करणं विष्णूवर्धनला आवडलं नव्हतं. त्यानं याबद्दल अनुषाकडे नाराजी व्यक्त केली. याबद्दल बोलण्यासाठी विष्णूवर्धन अनुषाला एका निर्जन स्थळी घेऊन गेला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या विष्णूवर्धननं अनुषाचा गळा आवळला. त्यामुळे अनुषाचा मृत्यू झाला. त्यानंतर विष्णूवर्धननं तिचा मृतदेह पालापाडा येथील एका कालव्यात टाकून नरासराओपेट पोलीस ठाणं गाठलं आणि स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

धूमस्टाईल बाईक रायडर ठरला देवदूत! तरुणानं दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या
 
पोलिसांनी या प्रकरणी विष्णूवर्धनविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. अनुषाच्या कुटुंबीयांनी आणि मित्र परिवारानं मोठ्या संख्येनं एकत्र येत आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी अनुषाच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्यात येईल, असं आश्वासनदेखील त्यांनी दिलं आहे.

Web Title: Enraged by classmates friendship with another man Andhra student strangles her to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.