शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

धक्कादायक! इंजिनिअर पती पत्नीसमोरच गर्लफ्रेंडसोबत लैंगिक संबंध ठेवायचा,दोघींनी मिळून उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:25 IST

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. १२ जानेवारी रोजी एका इंजिनिअरची दोन महिलांनी मिळून हत्या केल्याचे समोर आले.

उत्तर प्रदेशमधील इटावामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इटावा येथे १२ जानेवारी रोजी एका इंजिनिअरचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला, तपासात पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले असून प्रेयसीचा शोध सुरू केला आहे. पती पत्नीसमोरच प्रेयसीसोबत संबंध ठेवत होता असा आरोप पत्नीने केला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  ही घटना इटाला जिल्ह्यातील सिव्हिल लाईन्स परिसरात घडली. अभियंता राघवेंद्र यांची हत्या त्यांची पत्नी आणि प्रेयसीने ११ जानेवारी रोजी केली होती. त्यानंतर अनेक प्रकारच्या कथा रचल्या गेल्या पण पोलीस तपासात सर्व काही उघड झाले. नवी दिल्लीतील जिंदाल शॉप कंपनीत सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या ४५ वर्षीय राघवेंद्र यादव यांची डोक्यात जड वस्तूने वार करून हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. यानंतर, मृतदेह रजाईत गुंडाळून आग लावण्यात आली. 

घरात धूर येताच, शेजारच्या महिलेने डायल ११२ ला कळवले. त्या आधारे, फॉरेन्सिक टीम व्यतिरिक्त, पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी देखील तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. तपासादरम्यान, राघवेंद्र यादवची पत्नी किरण यादव आणि राघवेंद्रची प्रेयसी वर्षा यांनी मिळून हत्येनंतर मृतदेह जाळून टाकला. जेव्हा पोलिस अधिकारी तपासासाठी घटनास्थळी पोहोचले तेव्हा राघवेंद्रच्या पत्नीने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. पत्नी घटनेबाबत पोलिसांना वेगवेगळ्या कहाण्या सांगत होती.  तिच्या पतीची हत्या कोणी केली आणि पळून गेले हे तिला माहित नाही, असं ती सांगत होती.

या घटनेच्या तपासासाठी वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी चार पोलिस पथके तयार केली होती. १२ जानेवारी रोजी अभियंता राघवेंद्र यांचा मुलगा प्रिन्स यादव याने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्याच्या आईने त्याच्या वडिलांची हत्या केली असल्याचा आरोप केला. सिव्हिल लाईन पोलिसांनी राघवेंद्रची पत्नी किरण यादव हिच्या हत्येत वापरलेला लोखंडी मुसळ मोतीझील चौकाजवळून जप्त केला आहे. पत्नीने राघवेंद्र वागायला चांगला नव्हता असा आरोप केला आहे. तो त्याच्या पत्नीसमोर त्याच्या प्रेयसीशी शारीरिक संबंध ठेवायचा आणि तिला ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर त्याची पत्नी आणि प्रेयसीने मिळून त्याची हत्या केली असल्याचे उघड झाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश