शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची प्रकृती बिघडली, ससून रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 00:58 IST

शिवसेनेच्या तिकीटावर लढवली होती 2019 ची विधानसभा निवडणूक...

पुणे- अ‍ॅन्टिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रदीप शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जेलमध्येच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रदीप शर्मा यांना पोटात दुखत असल्याने गेल्या 12-15 दिवसांपूर्वीही ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर आता, सोनोग्राफी करण्यासाठी आणि पुढील उपचारांसाठी शर्मा ससूनमध्ये आहेत. एन्काऊटंर स्पेशलिस्ट अशी प्रदीप शर्मा यांची ओळख आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना त्यांच्या नावावर तब्बल 113  एन्काऊटंरची नोंद आहे. शिवसेनेच्या तिकीटावर लढवली होती 2019 ची विधानसभा निवडणूक - प्रदीप शर्मा हे 1983 साली पोलीस दलात रुजू झाले होते. पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी त्यांची ओळख होती. 2008 मध्ये त्यांना पोलीस दलातून निलंबितही करण्यात आले होते. मात्र, 2017 मध्ये आरोपांतून क्लिनचिट मिळाल्यानंतर ते पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले होते. त्यांनी  2017 मध्येच दाऊदच्या भावालाही अटक केली होती. यानंतर, त्यांनी 2019 साली पोलीस सेवेचा राजीनामा दिला. महत्वाचे म्हणजे, 2019 सालीच प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारामधून विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र यात त्यांचा पराभव झाला होता.

टॅग्स :Pradeep Sharmaप्रदीप शर्माMansukh Hirenमनसुख हिरणShiv Senaशिवसेनाsasoon hospitalससून हॉस्पिटलPuneपुणे