शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचा कंपनीच्या अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला चाकू मारला, डोकेही फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 20:14 IST

Assaulting Case : वैशाली नगरातील रहिवासी असलेले जनबंधू एजी एन्व्हायरमेंट कंपनीत झोन इन्चार्ज आहे.

ठळक मुद्देया हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अधिकार्‍याचे नाव विशाल युवराज जनबंधू (वय ३८) असे आहे.

नागपूर : कंपनीचा अधिकारी पक्षपातीपणाची वागणूक देतो, असा आरोप करून एका कर्मचाऱ्याने त्याच्या साथीदारांसह येऊन लाकडी फळी तसेच चाकूने हल्ला केला. यात अधिकाऱ्याचे डोके फाटल्याने तो गंभीर जखमी झाला. महापालिकेच्या झोन क्रमांक चार मधील बैद्यनाथ चौकाजवळच्या कचरा वाहन तळांमध्ये गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अधिकार्‍याचे नाव विशाल युवराज जनबंधू (वय ३८) असे आहे. 

वैशाली नगरातील रहिवासी असलेले जनबंधू एजी एन्व्हायरमेंट कंपनीत झोन इन्चार्ज आहे. ही कंपनी महापालिकेअंतर्गत कचरा संकलन आणि विल्हेवाटीचे काम करते. कंपनीत अनिकेत सुरेश पत्रे (वय २१) हा कामावर होता. त्याचे काम चांगले नसल्यामुळे त्याला अनेकदा ताकीद देण्यात आली होती. जनबंधू यांनी अनिकेतला गेल्या आठवड्यात चार दिवसासाठी कामावरून निलंबित केले. आज दुपारी २.३० च्या सुमारास अनिकेत त्याच्या एका साथीदारांसह कार्यालयात आला. येथे त्याने जनबंधू यांच्याशी वाद घातला. ते पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप करून शिवीगाळ करत अनिकेतने लाकडी फळीने जनबंधू यांच्या डोक्यावर जोरदार फटका मारला. त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. अशा स्थितीत आरोपी अनिकेतने त्यांच्यावर चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर आरोपी अनिकेत आणि त्याचा साथीदार शिवीगाळ करीत पळून गेले. या घटनेमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. सहकाऱ्यांनी जनबंधू यांना पाचपावलीच्या एका खासगी इस्पितळात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

 

मिळालेल्या माहितीवरून गणेशपेठचे ठाणेदार भारत क्षीरसागर यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर रुग्णालयात जनबंधू यांना विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र जनबंधू यांची प्रकृती गंभीर असल्याने ते फारसे काही सांगू शकले नाही. कार्यालयातील सहकार्‍यांनी दिलेल्या माहितीवरून हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आरोपी अनिकेत आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध कलम ३०७,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसnagpurनागपूर