Emotional Story: भावंडे टीव्ही पाहत होती, खेळता खेळता चिमुरडा बादलीत बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 05:33 IST2022-01-04T05:33:43+5:302022-01-04T05:33:51+5:30

खेळता खेळता घरातील बाथरूममध्ये गेला असता या ठिकाणी पाण्याने भरलेल्या बादलीत पडला.

Emotional Story: one year old child after drowning in a bucket | Emotional Story: भावंडे टीव्ही पाहत होती, खेळता खेळता चिमुरडा बादलीत बुडाला

Emotional Story: भावंडे टीव्ही पाहत होती, खेळता खेळता चिमुरडा बादलीत बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : घरात खेळता खेळता बाथरूममध्ये जाऊन पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने एक वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी शहरातील देऊनगर परिसरात घडली आहे. या घटनेची नोंद भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दिलकैश अन्सारी (वय १ वर्ष) असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळी तो घरात खेळत होता, तर त्याची आई स्वयंपाक बनवत होती. त्याची इतर भावंडे टीव्ही बघण्यात व्यस्त होती. यावेळी तो खेळता खेळता घरातील बाथरूममध्ये गेला असता या ठिकाणी पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. ही घटना मुलाच्या आईच्या लक्षात येताच तिने जिवाच्या आकांताने धावत पळत त्याला डॉक्टरांकडे नेले. मात्र रविवार असल्याने अनेक डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसल्याने जवळपास तीन चार रुग्णालये फिरविल्यानंतर अखेर त्यास आईने  इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दिलकैश सर्वात लहान
मृत दिलकैश हा सर्वात लहान होता. या प्रकरणी आई शबाना अन्सारी यांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Emotional Story: one year old child after drowning in a bucket