Gujarat Crime: तंत्रज्ञानाच्या वापरातून गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक खळबळजनक घटना गुजरातमध्ये समोर आली आहे. सूरतमध्ये दोन तरुण मैत्रिणींनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटीचा वापर करून आत्महत्येचा मार्ग शोधला आणि आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची दखल थेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी घेतली असून, त्यांनी यावर भयंकर अशी प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त केली आहे.
सूरतच्या डिंडोली भागातील रोशनी शिरसाठ (१९) आणि ज्योत्स्ना चौधरी (२०) या दोन बालमैत्रिणींनी स्वामीनारायण मंदिर परिसरातील वॉशरूममध्ये एनेस्थेशियाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. पोलीस तपासात समोर आलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. दोन्ही तरुणींनी आत्महत्येसाठी कोणत्या औषधांचा वापर करावा आणि वेदनामुक्त मृत्यू कसा मिळेल, यासाठी चॅट जीपीटीवर सर्च केले होते. त्यांच्या मोबाईलमध्ये एनेस्थेशिया इंजेक्शनशी संबंधित बातम्यांचे स्क्रीनशॉट्स आणि सर्च हिस्ट्री सापडली आहे.
मस्क यांची प्रतिक्रिया
एक्सवर एका युजरने ही बातमी शेअर केल्यानंतर एलन मस्क यांनी ती रिट्विट केली. एआय तंत्रज्ञानाचा असा घातक वापर पाहून त्यांनी आश्चर्य आणि भीती व्यक्त केली आहे.
गांधीनगरमध्येही कालव्यात उडी घेऊन सामूहिक आत्महत्या
सूरतच्या घटनेने शहर सुन्न असतानाच, राज्याची राजधानी गांधीनगरमधूनही अशीच एक दुःखद घटना समोर आली आहे. गांधीनगर महानगरपालिकेत नुकत्याच रुजू झालेल्या सेजल पटेल (२६) आणि रिपल रावत (२४) या दोन महिला कर्मचाऱ्यांनी नभोई कालव्यात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी एका तरुणीने घरी फोन करून मी मैत्रिणीसोबत आत्महत्या करायला जात आहे, असे सांगितले होते. नातेवाईक पोहोचेपर्यंत पाच तासांच्या शोधमोहिमेनंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
Web Summary : In Gujarat, two friends used ChatGPT to find ways to commit suicide via anesthesia. Elon Musk reacted, expressing fear about AI's misuse. Separately, two women in Gandhinagar also committed suicide by jumping into a canal. A concerning trend emerges.
Web Summary : गुजरात में दो सहेलियों ने एनेस्थीसिया से आत्महत्या करने के तरीके ChatGPT से खोजे। एलन मस्क ने एआई के दुरुपयोग पर चिंता जताई। गांधीनगर में भी दो महिलाओं ने नहर में कूदकर आत्महत्या की। यह एक चिंताजनक प्रवृत्ति है।